
दिल्ली: पॅनकार्ड आणि आधारकार्डच्या लिंकिंनंतर मतदान ओळखपत्राला आधारकार्ड लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ूबैठकीत घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून लवकरच यासंदर्भात तज्ज्ञ लोकांशी चर्चा करुन अंमलबजावणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह, आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृह सचिव, सचिव विधिमंडळ विभाग, सचिव एमईआयटीवाय आणि सीईओ, यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाचे तांत्रिक तज्ञ उपस्थित होते. या बैठकीत संविधानाच्या कलम 326 च्या तरतुदींनुसार ईपीआयसीला आधारशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ईपीआयसी क्रमांकावर आक्षेप घेतला होता. बंगालसह काही राज्यांमध्ये ईपीआयसी क्रमांक समान असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर पॅनकार्डप्रमाणेच आता मतदान ओळखपत्रही आधार कार्डाशी जोडण्याची प्रक्रिया वेग धरू लागली होती आज निवडणूक आयोगाने महत्त्वाची बैठक बोलावली, ज्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नक्की वाचा - CM Devendra Fadnavis : नागपुरात नेमकं काय घडलं? CM फडणवीसांनी विधानसभेत घटनाक्रम सांगितला
दरम्यान, लोकसभा तसेच विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बोगस मतदार रोखण्यासाठी आणि बनावट मतदार ओळखण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता येईल, असा निवडणूक आयोगाचा विचार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world