तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 11 मतदार संघात 7 मे ला मतदान होत आहे. त्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी या मतदार संघातला प्रचार थांबेल. तिसऱ्या टप्प्यात बऱ्याचश्या मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहे. बारामती लोकसभेचाही यात समावेश आहे. बारामतीत आज शरद पवार आणि अजित पवार सांगता सभा घेणार आहेत. दरम्यान या 11 मतदार संघात नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या मतदार संघात प्रचार थंडावणार?
तिसऱ्या टप्प्यात अकरा मतदार संघात मतदान होणार आहे. यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. यातील बारामती लोकसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इथली लढत ही सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी आहे. दोन्ही पवार एकमेकाच्या विरोधात ठाकरे आहे. त्यामुळे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष या लढतीकडे आहे.
हेही वाचा - "...तर मी देखील तुमच्यासाठी धावून येईन"; भरसभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींना शब्द
पवारांची सांगता सभा बारामतीत
शरद पवार यांची सांगता सभा बारामतीत आज दुपारी होत आहे. ही सभा शहरातील कसबा परिसरात लेंडी पट्टी येथे होणार आहे. सभेकरिता मोठा मंडप उभारण्यात आला आहे. नागरिकांना बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजित पवारही सांगता सभा घेणार आहेत. ही सभाही बारामतीतच होणार आहे.
हेही वाचा - राणेंचं कौतुक, उद्धव यांच्यावर 'प्रहार', मोदींना पाठिंबा! राज ठाकरेंच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे
शाहू महाराज, राणे, प्रणिती शिंदे,उदयनराजेंचे भवितव्य ठरणार
तिसऱ्य टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात शाहू महाराज, उदयन राजे भोसले, नारायण राणे, प्रणिती शिंदे यांचे भवितव्य ठरणार आहे. शिवाय सुनिल तटकरे, अनंत गिते, ओमराजे निंबाळकर, धैर्यशिल मोहिते पाटील, यांच्याही भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे हे सर्वच आता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नात असतील.