जरांगेंची गांधी-आंबेडकर-मौलाना आझादांशी तुलना करणारे सज्जाद नोमानी आहेत तरी कोण ?

Sajjad Nomani : वक्फ बोर्डाचे प्रवक्ते असलेले सज्जाद नोमानी यांनी आज एका पत्रकार परिषदेत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होऊ लागला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

वक्फ बोर्डाचे प्रवक्ते असलेले सज्जाद नोमानी यांनी आज एका पत्रकार परिषदेत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होऊ लागला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एक बैठक बोलावली होती. ही बैठक मुस्लिम आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरुंसोबत होती. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या मतांसोबत दलित आणि मुस्लिम समाजाची मतेही आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जरांगे यांनी हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 

नक्की वाचा: शिंदे गटाच्या नेत्यांने घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट, निवडणुकीचं अचूक टायमिंग साधल्याची चर्चा

धर्मगुरूंसोबतच्या या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये सामीव झालेल्या नोमानी यांनी म्हटले की "मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहेत. मनोज जरांगे यांच्या रुपात भारताला नवे बाबासाहेब आंबेडकर मिळणार आहेत. जरांगे यांच्या रुपात नवे मौलाना आझाद मिळणार आहेत,” 

नक्की वाचा : मनात मराठीचे विचार पण गुजरातीतून प्रचार! मनसेवर ही वेळा का आली?

नोमानी यांनी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, 'जरांगे फकीर आहे आणि मीही फकीर आहे. देशाला अशाच फकिरांची गरज आहे. आता राज्यांतील लोकांनी यावर विचार करावा.'  नोमानी यांच्याआधी मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, कोणते मतदार संघ लढवत आहोत आणि कोणते उमेदवार उभे केले आहेत याची घोषणा 3 नोव्हेंबरला केली जाणार आहे. जरांगे यांच्या भेटीला सज्जाद नोमानी यांच्याव्यतिरिक्त आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर, महानुभव पंथाची मंडळी आणि चंद्रशेखर आझाद यांचे प्रतिनिधी आले होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहेत सज्जाद नोमानी?

सज्जाद नोमानी हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. ते इस्लामसंदर्भात भाषणेही देत असतात. अनेकदा नोमानी हे आपली राजकीय भूमिका ठळकपणे मांडताना दिसतात.  यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नोमानी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी सगळ्या धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येत लोकशाहीविरोधी शक्तींचा मुकाबला करावा असे आवाहन केले होते. 

Advertisement

नोमानी यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करताना काँग्रेस पक्षावर टीका केली होती. राहुल गांधी सर्वसमावेशकतेची भूमिका मांडत असताना त्यांच्या अवती भोवतीची माणसे संकुचित विचारसरणीची असल्याचे नोमानी यांनी म्हटले होते. त्यांच्या प्रभावाखाली आल्यानेच राहुल गांधी यांनी क्वचितच मुसलमान हा शब्द त्यांच्या भाषणात वापरला असावा असे नोमानींचे म्हणणे होते. 

( नक्की वाचा : लोकसभेत मुस्लिमांची मतं घेतली, विधानसभेत विसरली! माजी मंत्र्यांचा काँग्रेसवर मोठा आरोप )

सीता, लक्ष्मणाबाबतच्या विधानामुळे वादंग

नोमानी यांनी रामायणासंदर्भात बोलत असताना बुरख्याचे महत्त्व सांगताना रामायणाचा संदर्भ सांगत ते पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे बराच वाद झाला होता. नोमानी यांनी म्हटले होते की भारतामध्ये मुलींना हिजाब घालण्यापासून रोखले जाते. संपूर्ण जगाला हिजाब घालणे हे भारतानेच शिकवले असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 

Advertisement

( नक्की वाचा : 6 कुतुबमिनारपेक्षाही उंच... सौदी अरेबिया असं काय बनवतंय ज्यावर संतापले आहेत जगभरातील मुस्लीम? )

रामायणाचा उल्लेख करत नोमानी यांनी म्हटले होते की लक्ष्मण हे सीतामातेसोबत 14 वर्ष वनवासात होते, मात्र तरीही ते सीतेचा चेहरा पाहू शकले नाही, कारण सीता ही पडद्याआड असायची आणि ती कायम चेहरा झाकून ठेवायची.

Advertisement