जाहिरात

मनात मराठीचे विचार पण गुजरातीतून प्रचार! मनसेवर ही वेळा का आली?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेनेही प्रयत्न केले होते. असे असताना विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला गुजराती भाषेची गरज भासू लागली आहे.

मनात मराठीचे विचार पण गुजरातीतून प्रचार! मनसेवर ही वेळा का आली?
मुंबई:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या स्थापनेपासू मराठीचा विचार मनात ठेवला होता. मराठी पाट्यांचे मनसेचे आंदोलन गाजले होते. मराठीसाठी मनसे नेहीमीच आग्रही राहीली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेनेही प्रयत्न केले होते. असे असताना विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला गुजराती भाषेची गरज भासू लागली आहे. मनात मराठीचा विचार आणि गुजरातीतून प्रचार अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या दहिसर विधानसभा मतदार संघात मनसेकडून गुजराती भाषेतून प्रचार केला जात आहे. त्यासाठी गुजरातीत पत्रकही छापण्यात आली आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभेच्या मैदानात मनसे उतरली आहे. मुंबईतल्या दहिसर विधानसभा मतदार संघातून राज ठाकरे यांनी राजेश येरूणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदार संघात मोठ्या प्रमाणात गुजराती मतदार आहेत. त्यांना आकर्षीत करण्यासाठी मनसे उमेदवार राजेश येरूणकर यांनी गुजराती भाषेचा आधार घेतला आहे. मतं मागण्यासाठी त्यांनी गुजराती भाषेत पत्रकं झापली आहेत. ही पत्रक गुजराती बहुल भागात वाटलीही जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Prakash Ambedkar Hospitalized : प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका, आजच अँजिओग्राफी होणार

मनसेकडून मतांसाठी गुजराती भाषेचा वापर होत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र दहिसर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात गुजराती आहेत. त्यांच्या पर्यंत पोहोचायचे असेल तर त्यांच्यात भाषेचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळेच गुजराती पत्रकं झापली असल्याचे मनसेचे उमेदवार राजेश येरूणकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेची मराठी बाबतची भूमिका शिथिल झाली आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं

मुंबईत राहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलता यायला पाहीजे. ही भाषा त्याला समजली पाहीजे अशी भूमीका राज ठाकरे यांनीच मांडली आहे. असे असताना गुजराती मतांसाठी गुजराती भाषेचा अवलंब केला जात आहे. हे मनसेला चालते का  असा प्रश्न आता मनसेचे विरोधक विचारत आहे. दहिसर विधानसभा मतदार संघ हा भाजपचा गड समजला जातो. काही काळ या मतदार संघावर शिवसेनेची पकड होती. 

ट्रेंडिंग बातमी -  प्रकाश आंबेडकरांच्या तब्बेतीबाबत मोठी अपडेट, सुजात आंबेडकरांनी काय आवाहन केलं?

दहिसर विधानसभा मतदार संघ महायुतीत भाजपच्या वाट्याला गेला आहे. मतदार संघातून भाजपने विद्यमान आमदार मनिषा चौधरी यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीत हा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला गेला आहे. या ठिकाणी ठाकरेंनी माजी आमदार विनोद घोसाळकर यांना रिंगणात उतरवले आहे. तर मनसेने राजेश येरूणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथे तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.