महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झाले आहे. आता 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्या आधी एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यात अनेकांनी महायुतीचे सरकार परत महाराष्ट्रात येईल असा कौल दिला आहे. तर काहींनी महाविकास आघाडीला संधी असल्याचंही म्हटलं आहे. त्याता आता सट्टाबाजारात काय सुरू आहे, त्याचे आकडे समोर आले आहेत. सट्टाबाजारात फालोदी सट्टाबाजाराने महाराष्ट्र विधानसभेचा निकाल काय असेल याचा अंदाज व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फालोदी सट्टाबाजाराने यावेळी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल असं भाकीत केलं आहे. राज्यातल्या 288 विधानसभा मतदार संघा पैकी 144 ते 152 जागा महायुतीला मिळतील असं फालोदी सट्टाबाजारानं म्हटलं आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप बनवेल. भाजपला 90 ते 95 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला 36 ते 40 जागा मिळतील. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 16 जागांवर समाधान मानावे लागेल. असा फालोदी सट्टाबाजाराचा अंदात आहे.
ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठे?
विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची लढली गेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्तेसाठी चढाओढ आहे. मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. त्यात महायुतीला सत्ता स्थापनेची संधी असल्याचे समोर आले आहे. मॅट्रीझ Exit Poll ने महायुतीचे सरकार येईल अशी शक्यता वर्तवली आहे. तर दैनिक भास्करने महाविकास आघाडीला बहुमत दिले आहे. चाणक्य, पी मार्क या संस्थानीही महायुतीच्या बाजूनच कल दिला आहे. इलेक्टोल एजने मात्र महाविकास आघाडीला कल दिला आहे.
सट्टाबाजाराने ही आता महायुतीला काटावरचे बहुमत दाखवले आहे. त्यामुळे 23 तारखेला महाराष्ट्रातल्या जनतेने कोणाच्या बाजून कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. शिवाय वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार आणि कोणाची डोकेदुखी ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. पण एक्झिट पोल आणि सट्टाबाजाराने तरी महायुतीला निकाला आधी दिलासा दिला आहे. दरम्यान निकाला आधी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अपक्षांना आतापासूनच संपर्क केला जात आहे.