जाहिरात

महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठे?

त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 84.79 टक्के मतदान झालं.

महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबई:

राज्यभरात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात 65.11 टक्के मतदान पार पडलं. दरम्यान सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोल्हापूरात सर्वाधिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झालं. 2019 मध्ये जवळपास 62 टक्के मतदान झालं होतं. यंदा हा आकडा वाढला असून सायंकाळपर्यंत 65.11 टक्के मतदान झालं. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झालं. संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 76.25 टक्के इतकं मतदान झालं. यामध्ये सर्वाधिक मतदान करवीरमध्ये झालं तर सर्वात कमी इचलकरंजीमध्ये झालं. दिवसभरात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तर काही ठिकाणी किरकोळ वाद देखील झाला. प्रशासन या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून होतं. ज्या ठिकाणी अडचणी होत्या तेथे तातडीने पोहोचत प्रक्रिया सुरळीत केली जात होती.

Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल

नक्की वाचा - Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल

कोल्हापूर मतदारसंघनिहाय आकडेवारी...

चांदगड - 74.61
हातकणंगले - 75.50
इंचलकरंजी - 68.95
कागल - 81.72
करवीर - 84.79
कोल्हापूर उत्तर - 65.51
कोल्हापूर दक्षिण - 74.95
राधानगरी - 78.26
शाहुवाडी - 79.04
शिरोल - 78.06

मुंबई शहराच्या तुलनेने मुंबई उपनगरात मतदानाचा टक्का अधिक दिसून येत आहे. जवळपास सर्व उपनगरांमधील विधानसभा मतदारसंघांमध्ये 50% पेक्षा जास्त मतदान झाल्याचे दिसून येते. भांडुप पश्चिम या विधानसभेत सर्वाधिक 61.12 टक्के मतदान झालं आहे. तर सर्वात कमी मतदान वर्सोवा या विधानसभेत 51.2% मतदान झाला आहे. 

Maharashtra Election 2024 Voting Highlights: पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात

नक्की वाचा - Maharashtra Election 2024 Voting Highlights: पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात

60 टक्के पेक्षा अधिक मतदान मिळवणाऱ्यांमध्ये बोरिवली विधानसभा 60.5% मतदान तर मुलुंड विधानसभा मतदारसंघात 60.49% मतदान झालं. मुंबई उपनगरात अल्पसंख्यांक प्रभाव असणारे काही विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात मतदान झालं आहे. मालाड 53.4%, वर्सोवा 51.2%, चांदीवली 50.7%, मानखुर्द 52%, अणुषक्ती नगर 54%, तर घाटकोपर पश्चिम 65%, गोरेगाव 55.43%, विलेपार्ले 56.98%, कांदिवली 54.59%, दहिसर 58%, मुलुंड 60.49%, भांडुप पश्चिम 61.12%, विक्रोळी 57%. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात उच्चाकी मतदान झालं असून येथे 76.25 टक्के मतदान झालं. तर येथील करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान झालं.   

राज्यभरातील मतदानाची आकडेवारी..

अहमदनगर - 71.73
अकोला - 64.98
अमरावती - 65.57
औरंगाबाद - 68.89
बीड - 67.79
भंडारा - 69.42
बुलढाणा - 70.32
चंद्रपूर - 71.27
धुळे - 64.70
गडचिरोली - 73.68
गोंदिया - 69.53
हिंगोली - 71.10
जळगाव - 64.42
जालना - 72.30
कोल्हापूर - 76.25
लातूर - 66.92
मुंबई शहर - 52.07
मुंबई उपनगर - 55.77
नागपूर - 60.49
नांदेड - 64.92
नंदूरबार - 69.15
नाशिक - 67.57
उस्मानाबाद - 64.27
पालघर - 65.95
परभणी - 70.38
पुणे - 61.05
रायगड - 67.23
रत्नागिरी - 64.65
सांगली - 71.89
सातारा - 71.71
सिंधुदुर्ग - 68.40
सोलापूर - 67.36
ठाणे - 56.05
वर्धा - 68.30
वाशिम - 66.01
यवतमाळ - 69.02
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com