जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे जरांगे यांनी एका रात्रीत येवढा मोठा निर्णय कसा काय घेतला?

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवणार होते. उमेदवारांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या होत्या. शिवाय उमेदवारी अर्जही दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे जरांगे यांनी एका रात्रीत येवढा मोठा निर्णय कसा काय घेतला? त्या रात्री पडद्यामागे काय काय घडलं? याची चर्चा आता सगळीकडे रंगली आहे. मात्र त्या रात्री पडद्या मागे नक्की का घडलं हे वकील असिम सरोदे यांनी समोर आणले आहे. NDTV मराठीला दिलेल्या खास मुलखतीत त्यांनी याबाबतचे अनेक खुलासे केले आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकशाही टिकली पाहीजे या उद्देशाने सध्या काम करत आहोत असे असिम सरोद म्हणाले. त्यासाठी लोकशाही मानणाऱ्या पक्षांची सत्ता यावी असं आपल्याला वाटत होते. जर मनोज जरांगे हे निवडणूक रिंगणात उतरले तर त्याचा फायदा भाजपला होवू शकतो. अशा वेळी निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी जरांगेना कोण उकसवत आहे? सतत त्यांना आव्हान कोण ते आहे हे जरांगेंच्या निदर्शनास आणून दिल्याचे सरोदे म्हणाले. राजकारणाला तुम्ही बळी पडू नका असेही सांगितले. महायुतीचे नेतेत तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात ओढत आहेत ही बाबत ही जरांगेंच्या निदर्शनास आणून दिली. 

ट्रेंडिंग बातमी - पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा, विरोधकांवरही तुटून पडले

जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी राग आहे. फडणवीसांनी आपल्याला हलक्यात घेतले होते. त्यांनी आंदोलन मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण भाजप विरोधात उमेदवार उभे करणार असे जरांगेंनी सरोदे यांच्या बरोबर झालेल्या बैठकी दरम्यान सांगितले. पण तसे करावं असं भाजपला वाटतं. तुमच्या उमेदवारा मुळे मविआचं नुकसान होवू शकतं शिवाय भाजपचा फायदा होवू शकतो ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. जे हरियाणात झाले ते महाराष्ट्रात करण्याचा भाजपचा डाव आहे. मतविभाजनाचा फायदा भाजपलाच होणार आहे असेही जरांगेंना सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - 'खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा..', साताऱ्यातील सभेत CM शिंदे कडाडले; ठाकरेंवर हल्लाबोल

जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं हा ही त्याचा डावाचा भाग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. जर तुम्ही रिंगणात आला तर गोंधळाची स्थिती निर्माण होईल. मराठा मतांचे विभाजन होईल असेही ते म्हणाले. तुमचा केवळ उपयोग करून घेतला जाईल. असे चर्चा दरम्यान सांगितले गेले. निवडणूक लढून पाच दहा जण निवडून ही येतील. पण त्याचा मराठा आरक्षणासाठी काही फायदा होणार नाही. त्यांना विधानसभेत मुळात संधी किती मिळेल याबाबतच प्रश्न आहे ही बाबही जरांगेना सांगितली गेली. असं सरोदे यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मविआचं सरकार का पाडलं? ठाकरेंनी खरं कारण सांगितलं

शिवाय निवडून आलेल्या आमदारांना विकत घेणं ही भाजपसाठी सोपी गोष्ठ आहेत. यामुळे आंदोलनही विस्कळीत होईल. असं ही जरांगे यांना त्या बैठकीत समजवून सांगण्यात आलं. ही बैठक रात्री साडे अकरा वाजता सुरू झाली. ती पाहाटे साडी तीन वाजेपर्यंत चालली होती अशी माहितीही सरोदे यांनी दिली. या बैठकीत सरोदे आणि जरांगेंचे दोन तीन सहकारी उपस्थित होते.  या बैठकीनंतर सर्व सुत्र हलली असावीत असे सरोदे सांगता. कारण या बैठकीत आपण त्यांची समजूत काढण्यात यशस्वी झालो असं वाटत असल्याचे सरोदे यांनी सांगितले.