सातारा लोकसभा मतदार संघातून भाजपच्या छत्रपती उदयन राजे भोसले यांनी विजय नोंदवला. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदार संघात शिंदेंचा पराभव होणे हा खरा तर शरद पवारांसाठी धक्का होता. पण या पराभवाची कारणमीमांसा केल्यानंतर मोठी गोष्ट समोर आली आहे. पराभवासाठी जे कारण समोर आले आहे ते पाहाता पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसला काळजीपूर्वक पाऊलं टाकावी लागणार आहे. शिवाय याबाबत आता राष्ट्रवादीत मंथनही केले जात आहे. शिंदे यांना 32 हजाराच्या फरकाने पराभव स्विकाराला लागला आहे.
हेही वाचा - मुंबईचा बडा नेता थेट उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात, निकाल काय लागला?
शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. अजित पवारांनी बंड केल्यानंतर शिंदे यांनी शरद पवारांना साथ दिली होती. त्यामुळे त्यांना सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी ही देण्यात आली. शिंदे यांची बाजू पहिल्यापासून भक्कम समजली जात होती. निवडणूक झाली. मतमोजणीला सुरूवातही झाली. पहिल्या फेरीपासून शिंदे यांना मताधिक्यही मिळत गेले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषही केला. मिरवणूकीची तयारी झाली. खासदार म्हणून बॅनरही लागले. पण अचानक त्यांनी घेतलेली आघाडी कमी झाली. ती इतकी कमी झाली की उदयन राजे भोसले यांनी थेट विजयच नोंदवला.
हेही वाचा - महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?
हक्काची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली. पराभव का झाला याची कारणमीमांसा केली गेले. पराभवाची कारणे शोधली गेली. त्यावेळी एक धक्कादायक गोष्ट ठळकपणे दिसून आली. सातारा लोकसेभेत शशिकांत शिंदे यांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस हे होते. तर याच मतदार संघात अन्य एक उमेदवार संजय गाडे हे अपक्ष म्हणून उभे होते. त्यांचे चिन्ह हे पिपाणी होते. तुतारी चिन्हाशी त्याचे साधर्म्य होते. त्यामुळेच की काय या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तब्बल 37 हजार 062 मते घेतली आहे. तर शशिकांत शिंदे यांचा पराभव 32 हजार 771 मतांनी पराभव झाला आहे. चिन्हा मुळे हा घोळ झाल्याचे राष्ट्रवादीला वाटते. अन्य अपक्षांना येवढ्या मोठ्या प्रमाणात मते मिळालेले नाहीत. त्यामुळे ही मते तुतारीची होती मात्र ती पिपाणीला गेली आणि पराभव झाला असा एक अंदाज बांधला जात आहे.