जाहिरात

मुंबईचा बडा नेता थेट उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात, निकाल काय लागला?

2019 साली विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होता. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते वेट अँण्ड वॉच या भूमीकेत होते. शेवटी त्यांची प्रतिक्षा संपली आणि त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.

मुंबईचा बडा नेता थेट उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात, निकाल काय लागला?
मुंबई:

कृपा शंकर सिंह हे मुळचे उत्तर प्रदेशातले. मात्र त्यांची कर्मभूमीही मुंबई राहीली आहे. काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले. आमदार, मंत्री, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले आणि ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकले गेले. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपबरोबर जवळीक वाढली. शेवटी भाजपमध्ये प्रवेशही केला. 2019 साली विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होता. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते वेट अँण्ड वॉच या भूमीकेत होते. शेवटी त्यांची प्रतिक्षा संपली आणि त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र ही उमेदवारी त्यांनी मुंबईतून नाही तर उत्तर प्रदेशातून देण्यात आली.   

हेही वाचा - 'सरकारमधून मोकळं करा'; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेले महत्त्वाचे प्रश्न

भाजपने कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातल्या जौनपूर लोकसभा मतदार संघातून थेट निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र मुंबईतून थेट उमेदवार आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशा माझी आई आहे आणि मुंबई माझी मावशी आहे असे सांगत सिंह यांनी प्रचाराला सुरूवात केली. स्थानिक विरूद्ध बाहेरचा असा प्रचारही या मतदार संघात केला गेला. मात्र मोदी आणि योगी यांची जादू आपल्याला तारेल असा अंदाज कृपा शंकर सिंह यांचा होता. पण त्यांचा हा अंदाज चुकला. उत्तर प्रदेशात भाजपला मोठा दणका बसला. अनेक जागांवर पराभव ही झाला. दिग्गजांना, मंत्र्यांना पराभव सहन करावा लागला. त्यापैकीच एक मतदार संघ होता कृपाशंकर सिंह यांचा जौनपूर लोकसभा मतदार संघ. 

हेही वाचा -  महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?

जौनपूर लोकसभा मतदार संघात भाजपच्या कृपाशंकर सिंह यांचा समना इथे समाजवादी पार्टीच्या बाबू सिंह कुशवाह यांच्या बरोबर होता. इंडिया आघाडीच्या या उमेदवाराने कृपाशंकर सिंह यांच्या समोर मोठं आव्हान उभे केले होते. इथे या दोघांत थेट लढत झाली. शिवाय बहुजन समाज पक्षाचे विद्यमान खासदार शामसिंह यादव हेही मैदानात होते. मात्र समाजवादी पक्षाच्या बाबू सिंह कुशवाह यांनी जोरदार मुसंडी मारत कृपा शंकर सिंह यांचा मोठा पराभव केला. कुशवाह यांना 5 लाख 9130 मते घेतली. त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्यावर जवळपास एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. सिंह यांना 4 लाख 09795 मते मिळाली. तर बहुजन समाज पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहीला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com