मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठत आहे. शिवाय त्यांचे अनेक सहकारी त्यांच्या या निर्णयानंतर पक्ष सोडून गेले. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज ( शनिवारी ) पत्रकार परिषद घेवून मोदींना पाठींबा का दिला याचे स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलताना त्यांनी पाठींबा देताना पक्षाचा विचार करावा लागतो असेही म्हणाले. शिवाय मोदी नसते तर राम मंदीर झाले नसते असेही राज म्हणाले. 2014 साली जे झाले त्यावर आपण टिका केली होती. भूमिका बदलेली नव्हती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टिकेचे लक्ष केले. मुख्यमंत्री पद हवेत म्हणून भूमिका बदलली नाही. चाळीस आमदार फुटले म्हणून भूमिका बदलली नाही. असे राज म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे हे नेहमी भूमिका बदलतात अशी टिका होता. पण ही गोष्ट चूकीची असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मोदींवर 2014 नंतर जे काही बोललो ती टिका होती, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे. मात्र काही लोकांनी निवडणूक झाल्यानंतर भूमिका बदलली त्या बद्दल कोणी बोलत नाही असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री पद हवे म्हणून भूमिका बदलली नाही. चाळीस आमदार फुटले म्हणून भूमिका बदलली नाही. असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
'मोदींना एक संधी मिळाली पाहीजे'
राम मंदीराचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. जर मोदी नसते तर राम मंदीर उभं राहू शकलं नसतं. राम मंदीराच्या रुपाने शरयू नदीत त्यावेळी तरंगलेल्या कारसेवकांच्या मृतदेहांना शांती मिळली असेल असंही ते म्हणाले. मोदींना पुन्हा एक संधी मिळणे देशाची गरज आहे. त्यामुळेच त्यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी बाबतच्या मोदींकडे मागण्या
महाराष्ट्राच्या काही मागण्या मोदींकडे केल्या आहेत. त्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, तरुणांना रोजगार मिळावे. रोजगारासाठी याठिकाणी पोषक वातावरण असावे यांचा समावेश आहे. त्याच बरोबर नवनवे उद्योग व्यवसाय महाराष्ट्रात यावेत यासारख्या मागण्या असल्याचे ते म्हणाले. याबाबतची आपली भूमिका मोदींना कळवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे भाजपसाठी सभा घेणार?
महायुतीच्या उमेदवारांचा मनसेचे नेते, कार्यकर्ते प्रामाणिक पणे प्रचार करतील. त्यासाठी कोणाला संपर्क करायचा याची यादी दोन दिवसात महायुतीच्या नेत्यांना दिली जाईल असेही राज यांनी स्पष्ट केले. मनसेच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवावे. महायुतीला पुर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यासाठी सकारात्मक आहे असे राज यांनी सांगितले. पण त्याबाबत अजून निश्चित काही ठरले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.