'बारामतीत अजित पवारांना हरवणार, मग पक्ष सोडणार'

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

बारामती लोकसभा निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांना घाम गाळावा लागतोय. सुनेत्रा पवार जिंकणारच असा विश्वास अजित पवारांना आहे. पण आता त्यांचाच खंदा समर्थक  नेत्याने त्यांच्या विरोधात शुड्डू  ठोकून उभा आहे. काही झालं तरी अजित पवारांचा बारामतीत पराभव करणार मगच पक्ष सोडणार अशी शपथचं त्यांनी घेतली आहे. हा नेता आजही अजित पवार गटातच आहे. मात्र त्यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर थेट भूमिका घेत अजित पवारांनाच चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे हा नेता ज्या समाजातून येतो त्यांचे मोठे वर्चस्व बारामती लोकसभेत आहे हे विशेष.       

उत्तम जानकरांनी दंड थोपटले 
उत्तम जानकर हे धनगर समाजाचे मोठे नेते. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. माढ्यातील माळशीसर हा त्यांचा गड आहे. जानकरांनी आता माढ्यात मोहिते पाटलांबरोबर जुळवून घेतलं आहे. अशा वेळी त्यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज केले आहे. अजित पवारांना बारामतीत हरवणार मगच त्यांचा पक्ष सोडणार असा पणच त्यांनी केला आहे. सध्या जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहे. बारामती लोकसभेत धनगर समाजाची मोठी मतं आहेत. यासर्व बाबी लक्षात घेता जानकारांचा पण अजित पवारांना भारी पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Advertisement

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाने 87 मृत्यूमुखी, 82 जखमी, 2500 हून अधिक घरांचे नुकसान
  
30 वर्षाचं वैर संपलं 

माढ्यात शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय उत्तम जानकर यांनी घेतला आहे. शिवाय मोहित पाटील यांच्या बरोबर असलेलं 30 वर्षाचे राजकीय वैरही संपवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धैर्यशील मोहिते पाटलां काही झालं तरी खासदार करणार असेही ते म्हणाले. भाजपने आपली फसवणूक केली असा आरोपही त्यांनी केलाय. या पुढे असे होवू नये म्हणून मोहिते पाटील आणि आपण जागृत राहाणार असल्याचेही ते म्हणाले. फडणवीसांना भेटायला विमानाने गेलो होतो हे खरं आहे. पण त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो. दहा वर्ष तुम्ही फुकट का घालवली अशी विचारणा त्यांना केली होती. 

Advertisement

हेही वाचा - नांदेडमध्ये चिखलीकर मैदानात प्रतिष्ठा मात्र चव्हाणांची पणाला

लोकसभेत मोहिते पाटील विधानसभेत जानकर 
लोकसभेत धैर्यशिल मोहिते पाटील आणि विधानसभेत उत्तम जानकर हे आमचं ठरलं आहे, असं धैर्यशिल मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं. मोहिते पाटील घरानं पवारांना हा शब्द दिला असल्याचेही ते म्हणाले. आता वैर संपलं आहे. मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे असेही धैर्यशिल म्हणाले. दरम्यान यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माढा जिंकल्यात जमा आहे असं जाहीर करून टाकलं. 

Advertisement

हेही वाचा - प्रियांका गांधींच्या टीममधील नेत्याची कोल्हापुरात बंडखोरी, रडत-रडत भरला अर्ज