प्रादेशिक पक्षांबरोबर छोटे पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यावरून उलटसुलट चर्चाही सुरू झाली. इतकेच काय तर शरद पवार ही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का? अशी विचारणा होऊ लागली. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे पुढे आता पर्याय काय? याचीच जणू चाचपणी सुरू झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पृथ्वीराज चव्हण यांचं मोठं वक्तव्य
शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या त्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे थेट बोलले आहेत. पवारांनी ते वक्तव्य आपल्या समोरच केल्याचे ते म्हणाले. देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला लागत आहेत. त्यानंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार येण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी प्रादेशिक पक्ष आणि छोटे पक्ष सत्तेतल्या वाट्यासाठी आघाडीत येतील. किंवा काही जण काँग्रेसमध्ये विलीन होती असे चव्हाण म्हणाले आहेत. मोठ्या प्रमाणात असलेले प्रादेशिक पक्ष जनतेला काही आवडत नाही. अमेरीकेत किंवा इंग्लडमध्ये दोनच पक्ष आहेत. त्या दिशेने देशाची वाटचाल होईल असेही चव्हाण म्हणाले. शरद पवार जे काही म्हणाले त्यांच्या भावनेशी आपण समहमत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यासाठी 4 जूनची वाट पाहाली लागेल असे सुचक वक्तव्यही चव्हाण यांनी केले.
हेही वाचा - गोडसे - वाझेंच्या लढतीत शांतिगीरी महाराजांची एन्ट्री, कोणाचं गणित बिघडणार?
काय म्हणाले होते शरद पवार?
आगामी काळात देशातील प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाकतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादंगही निर्माण झाला. मात्र शरद पवारांनी हे वक्तव्य का आणि कशासाठी केले आहे याबाबत मात्र कुणालाही ठाव लागलेला नाही. जो तो आपल्या परीने या वक्तव्याचा अर्थ लावत आहेत. मात्र पवारांनी निवडणुकीच्या काळात हे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
हेही वाचा - फलक लावला, जाहीर रजा मागितली; मुश्रीफ निघाले फॉरेनला, सोबत कोण कोण?
विरोधकांनी पवारांना घेरले
शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलताना पवारांचे वक्तव्य हे सुचक आहे. याआधीही त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. पवारां बरोबर ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होईल. ती आता फक्त औपचारीकता राहीली आहे असे म्हटले होते.