जाहिरात

​Aamir Khan Marriage: अमिर खानच्या तिसऱ्या बायकोचं वय किती? दोघांमध्ये किती वर्षांचे आहे अंतर, पहिल्या दोघी..

गौरीचे हे दुसरे लग्न आहे. तिला पहिल्या पतीपासून एक 7 वर्षांचा मुलगा आहे.

​Aamir Khan Marriage: अमिर खानच्या तिसऱ्या बायकोचं वय किती? दोघांमध्ये किती वर्षांचे आहे अंतर,  पहिल्या दोघी..

'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळख असलेल्या अमिर खानने वयाच्या 61 व्या वर्षा तिसऱ्यांदा लग्न गाठ बांधली आहे. आमिर खानने त्याची गर्लफ्रेंड असलेल्या गौरी स्प्रैटसोबत लग्न केले आहे. त्याने अत्यंत खाजगी वातावरणात हे तिसरे लग्न उरकले. आमिरच्या घरीच हा विवाह सोहळा पार पडला आहे. ज्यामध्ये केवळ कुटुंबिय आणि जवळचे मित्र यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दोघांनी मॅरेज रजिस्टरवर स्वाक्षरी करून कायदेशीररित्या लग्न केले आहे. अमिर खानचे हे तिसरे लग्न आहे. या लग्नानंतर आमिरची नवी बेगम गौरी आणि त्याच्या वयातील अंतराची चर्चा सुरू झाली आहे. 

​​गौरी स्प्रैट ही मूळची बेंगळुरूची राहणारी आहे. तिने तिचे करिअर पण बंगळुरूमध्ये सुरू केले. तिची आई रीटा स्प्रैट तिथे एक प्रसिद्ध सलून चालवत होत्या. गौरीने आपले शिक्षण 'ब्लू माउंटेन स्कूल'मधून पूर्ण केले आहे. त्याच सोबत 'युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स, लंडन'मधून स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. त्यानंतर तिने मुंबईत आपलं करिअर केलं.  सध्या ती मुंबईत 'BBlunt' सलून चालवते. तिची एकूण संपत्ती 8 ते 12 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. गौरीचे हे दुसरे लग्न आहे. तिला पहिल्या पतीपासून एक 7 वर्षांचा मुलगा आहे.

नक्की वाचा - Shocking news: रोहित शेट्टी खंडणी प्रकरणाचे थेट पाकिस्तान कनेक्शन समोर? तपासात पोलिस ही चक्रावले

​आमिर खान आणि तिसरी पत्नी गौरी यांच्या किती वर्षाचे अंतर आहे याची ही चर्चा सुरू झाली आहे. आमिरचा जन्म 14 मार्च 1965 रोजी झाला आहे. आमिरचे सध्याचे वय हे 61 वर्ष आहे. तर तिसरी पत्नी गौरीचा जन्म 21 ऑगस्ट 1978 रोजी झाला आहे. म्हणजेच या दोघांमध्ये जवळपास 13 ते 14 वर्षांचे अंतर आहे. या आधी आमिरने दोन लग्न केले आहेत. पहिलं लग्न आमिरने रीना दत्ता सोबत केले होते. तर दुसरे लग्न हे चित्रपट निर्माती किरण राव यांच्या सोबत केले होते. या दोघीं सोबत आमिरने घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर आता हे तिसरे लग्न केले आहे. 

नक्की वाचा - DMart Bill: डी मार्टच्या बिलावर पेनाने तीन रेषा का मारतात? 99 टक्के लोकांना याची कल्पनाच नाही

आमिरचे पहिले लग्न 1986 मध्ये रीना दत्तासोबत झाले होते. या दोघांमध्ये वयाचे जास्त अंतर नव्हते. हे दोघे ही जवळपास समान वयाचे होते. रीना आणि आमिर यांना जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर आमिरने 2005 मध्ये चित्रपट निर्माती किरण राव यांच्या सोबत दुसरे लग्न केले. या दोघांमध्ये ९ वर्षांचे अंतर होते. पुढे किरण राव आणि आमिर खान हे 2021 मध्ये वेगळे झाले. विषेश म्हणजे आमिरचा मोठा मुलगा जुनैद अजून अविवाहीत आहे. तर एका मुलीचे लग्न झाले आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही आपल्या वडीलांची दोन्ही लग्न पाहीली आहेत.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com