जाहिरात

Bapya Movie: 'बाप्या'ने गाठला जागतिक मंच! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026मध्ये अधिकृत निवड

Bapya Movie: बाप्या या मराठी सिनेमाने विक्रम नोंदवलाय.

Bapya Movie: 'बाप्या'ने गाठला जागतिक मंच! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026मध्ये अधिकृत निवड
"Bapya Movie: बाप्या सिनेमाचा विक्रम"
Bapya Movie

Bapya Movie: मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष खरोखरच खास ठरतंय. आगामी मराठी सिनेमा 'बाप्या'ची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ्फ) 2026 च्या 'मराठी सिनेमा कॉम्पिटिशन' या विभागात अधिकृत निवड झालीय. पिफ्फ 2026 मधील ही निवड ‘बाप्या'साठी महत्त्वाचा टप्पा असून संवेदनशील विषय हाताळणाऱ्या मराठी सिनेमांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय ओळखीच्या दृष्टीने हे यश महत्त्वाचे मानले जात आहे.

काय आहे बाप्या सिनेमाची कथा?

समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या'ची कथा दापोली येथील एका लहान मासेमार कुटुंबाभोवती फिरणारी आहे. कुटुंबातील नातेसंबंध, समाजातील दृष्टीकोन आणि वैयक्तिक संघर्ष यांचा हळुवार वेध घेणारी ही गोष्ट आहे. भावनिक संवेदनशीलता, विनोद आणि सामाजिक भाष्य यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो. या सिनेमाची निर्मिती मुक्तल तेलंग आणि समीर तेवारी यांनी केली असून गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या 'बाप्या' मध्ये प्रमुख भूमिका आहेत.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Bapya Movie

(नक्की वाचा: Kangana Ranaut: आयुष्य नरक झालं होतं, 10 वर्षांनंतर Hrithik Roshanसोबतच्या कायदेशीर लढाईवर कंगना राणौतची पोस्ट)

संपूर्ण टीमसाठी प्रोत्साहन 

दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात,"बाप्या ही माणुसकी, स्वीकार आणि नात्यांची गोष्ट आहे. ‘पिफ्फ' सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर आमच्या चित्रपटाची निवड होणे, हे संपूर्ण टीमसाठी मोठे प्रोत्साहन आहे. मराठी चित्रपटाच्या संवेदनशील कथा आता जागतिक स्तरावर पोहोचत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com