नयनतारा सध्या तिच्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या डॉक्युमे्न्ट्रीमुळे चर्चेत आहे. नयनताराच्या जीवनावर आधारीत ही डॉक्युमेन्ट्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. आता साऊथ सिनेसृष्टीतील मोठा स्टार आणि एके काळी रजनीकांतचा जावई असलेल्या धनुषने या डॉक्युमेन्ट्री र 10 कोटी रुपयांची केस ठोकली आहे. नयनतारानेही या प्रकरणात पुढे होत सोशल मीडियावर 3 पानी खुले पत्र लिहून धनुषवर आपला राग काढला आहे.
'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. धनुषचा या डॉक्युमेन्ट्रीशी काय संबंध आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. धनुषने डॉक्युमेन्ट्र्री निर्मात्यांविरुद्ध 10 कोटी रुपयांचा कॉपीराइट खटला दाखल केला आहे.
3 सेकंदाच्या क्लिपवरुन वाद
या डॉक्युमेन्ट्रीमध्ये नयनताराच्या 'नानुम राउडी धन' या चित्रपटातील केवळ 3 सेकंदांची क्लिपिंग वापरण्यात आली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात येत आहे. या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत असून तिचा पती विघ्नेश शिवन याने दिग्दर्शन केले आहे. मात्र धनुषने चित्रपटाची निर्मिती केली असून या गाण्याच्या वापरावर तो नाराज आहे.
मात्र धनुषने खटला दाखल केल्यानंतर नयनताराने सोशल मीडियावर त्याच्याविरोधात आपला राग व्यक्त केला आहे. शनिवारी नयनताराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक मोठी पोस्ट शेअर केली. तिने या खुल्या पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे की, नुकताच प्रदर्शित झालेला नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री, 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' बनवताना तिने धनुषकडे त्याच्या 2015 मध्ये आलेल्या 'नानुम राउडी धन' चित्रपटातील दृश्ये वापरण्याची परवानगी मागितली होती. मात्र, धनुषने त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी त्यांना चित्रपटाच्या सेटवरील पडद्यामागील फुटेज वापरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली.
विनंती करुनही तुम्ही परवानगी दिली नाही
नयनताराने पत्रात म्हटलं की, 'एनओसीसाठी तुमच्याशी दोन वर्षे संघर्ष केल्यानंतर आणि आमच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीच्या रिलीजसाठी तुमच्या मंजुरीची वाट पाहिल्यानंतर आता तडजोड करुन आम्ही सध्याचं व्हर्जन तयार केलं आहे. अनेक विनंती करूनही तुम्ही नाम राउडी धनची गाणी किंवा सीन कट, अगदी छायाचित्रे वापरण्यास परवानगी नाकारली होती.
माझ्या आगामी डॉक्यमेंट्रीबाबत तुम्ही जे वागत आहात, त्याचा मी आणि माझ्या जोडीदाराच परिणाम होणार नाही तर या डॉक्युमेंट्रीवर दीर्घकाळ काम करणाऱ्या लोकांवरही परिणाम होईल. माझ्या या डॉक्यमेंट्रीमध्ये इंडस्ट्रीतील अनेक शुभचिंतकांच्या क्लिप आहेत. डॉक्युमेंट्री बनवण्यात त्यांचे खूप योगदान आहे. पण मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट नानुम राउडी धन हा त्याचा एक भाग बनवू शकणार नाही याचे मला दुःख आहे, असं नयनताराने म्हटलं.
आम्ही समजू शकतो की हा एक व्यवसाय आहे. पण हे ऐकून वाईट वाटले की तुमच्या ईर्षेमुळे तुम्ही आम्हाला हे सर्व वापरण्यापासून थांबवले आहे. जेव्हा तुम्ही आम्हाला आमच्या ट्रेलरवर कायदेशीर नोटीस पाठवली तेव्हा माझ्यासाठी ते अधिक धक्कादायक होते. तुमची नोटीसमध्ये वाचून आम्हाला आश्चर्य वाटले की आम्ही आमच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या चित्रपटाशी संबंधित व्हिडिओ देखील तुम्हाला काढून टाकायचे आहेत. जे चित्रपटाच्या पडद्यामागे होते आणि ट्रेलरमध्ये केवळ 3 सेकंद होते.
यातून तुमचं व्यक्तीमत्व दिसतं
नयनताराने या पत्रात पुढे म्हटले आहे की, डॉक्युमेन्ट्रीमध्ये वापरलेली दृश्ये लोकांच्या फोनवरून चित्रित करण्यात आली होती आणि यावर आक्षेप घेतल्याने तिने धनुषवर नाराजी व्यक्त केली आहे. नयनतारा म्हणाली, 'तुमची ही आतापर्यंतची सर्वात खालची पातळी आहे आणि ती तुझ्या व्यक्तीमत्वाबद्दल बरेच काही सांगते.
धनुषच्या कायदेशीर नोटीसला योग्य उत्तर देईन असेही नयनताराने म्हटले आहे. तिने लिहिले की, 'मला तुमची कायदेशीर नोटीस मिळाली आहे आणि आम्ही कायदेशीर मार्गाने त्याला योग्य उत्तर देऊ. आमच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीसाठी नानुम राउडी धनच्या एलिमेन्ट्सच्या वापरासाठी एनओसी देण्यास नकार देण्याचे कॉपीराइटच्या दृष्टिकोनातून तुम्ही न्यायालयात समर्थन करू शकता. परंतु मी तुम्हाला आठवण करून देतो की त्याची एक नैतिक बाजू आहे, ज्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही. देवाच्या कोर्टाचे रक्षण केले पाहिजे.