जाहिरात
This Article is From Apr 21, 2024

जळगावातील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर, 22 तास सुरू होती चौकशी

जळगाव सुवर्णनगरीतील आर. सी. बाफना या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या नयनतारा या दालनात आयकर विभागाच्या पथकाने तब्बल 20 तास चौकशी केली आहे.

जळगावातील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर, 22 तास सुरू होती चौकशी
जळगाव:

जळगाव सुवर्णनगरीतील आर. सी. बाफना या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या नयनतारा या दालनात आयकर विभागाच्या पथकाने तब्बल 20 तास चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुसुंबा गावाजवळ नाकाबंदी दरम्यान एका वाहनात सोने व सोन्याचे दागिने आढळून आले होते. या वाहनाची कसून चौकशी केली असता वाहनात आढळून आलेले सोने आर सी बाफना ज्वेलर्सची असल्याची माहिती समोर आली. यानंतर आयकर विभागाच्या पथकाने 20 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून सुमारे 22 तास या प्रकरणाची चौकशी केली. 

अद्याप याप्रकरणी कुठलीही कारवाई आयकर विभागाकडून झाली नसल्याची देखील माहिती आहे. तर वाहनात आढळून आलेल्या सोने व सोन्याचे दागिने याची सर्व माहिती आयकर विभागाच्या पथकाला दिली असून आयकर विभागाच्या पथकाने याची पडताळणी देखील केली असल्याची माहिती आर सी बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना यांनी दिली आहे.

हे ही वाचा-भारताचा विकास दर 6.8 राहण्याचा अंदाज, IMF ने जारी केली आकडेवारी

यापूर्वी जळगावातील RL ज्वेलर्सची आयकर विभागाकडून 48 तास चौकशी करण्यात आली होती. यावेळी 87 लाखांची रोख आणि कोट्यवधींचं सोनं जप्त करण्यात आलं होतं. याशिवाय गेल्या वर्षी पुण्यातील नीळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. 2023 मध्ये नीळकंठ ज्वेलर्स या सराफा पेढीत गैरप्रकार घडल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्याच्या आधारावर छापेमारी करण्यात आली होती. दुकानाबरोबरच नीळकंठ ज्वेलर्सच्या मालकाच्या घरावरही धाड टाकण्यात आली होती. यामध्ये सोनं किंवा दागिने नाही मात्र काही कादगपत्रं जप्त करण्यात आली होती. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com