जाहिरात
Story ProgressBack

लवकरच आजी होणार नीना गुप्ता; मसाबाने दिली Good News! 

'बधाई हो' चित्रपटातून सिनेमा क्षेत्रात कमबॅक करणारी दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता हिच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे.

Read Time: 2 min
लवकरच आजी होणार नीना गुप्ता; मसाबाने दिली Good News! 
मुंबई:

नीना गुप्ता आजी होणार असल्याची गुड न्यूज लेक मसाबाने आज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. 'बधाई हो' चित्रपटतून सिनेमा क्षेत्रात कमबॅक करणारी दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता हिच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. नीना गुप्ता हिची लेक मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. मसाबाने नुकतीच आपल्या गर्भारपणाची घोषणा केली आहे. तिने पती सत्यदीप मिश्रा याच्यासोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. 

नीना गुप्ताची मुलगी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा आणि सत्यदीप यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं होतं. मसाबा आणि सत्यदीप दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. लग्नाच्या एक  वर्षानंतर दोघेही आई-वडील होणार आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

34 वर्षीय मसाबाने इन्स्टाग्रामवर प्रेग्नेंट महिलेची इमोजी शेअर केली आहे. या पोस्टच्या शेवटी मसाबा आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांचा फोटो आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, इतर बातम्यांमध्ये - दोन लहानगी पाऊलं आमच्या दिशेने येत आहे. कृपया प्रेम, आशीर्वाद आणि केळ्याचे चिप्स पाठवा ( फक्त मीठ घातलेले). त्यांनी हॅशटॅगमध्ये #babyonboard #mom&dad असं लिहिलं आहे. 

मसाबाच्या पोस्टनंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राने लिहिलंय, शुभेच्छा आई.. रोशनी चोप्रा लिहिते... ओएनजी हॅप्पी हॅप्पी.. शुभेच्छा... मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा यांनी 2020 मध्ये डेटिंग सुरू केलं होतं. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात ते दोघं लग्नाच्या बंधनात अडकले. मसाबा गुप्ताने 2015 मध्ये दिग्दर्शक मधु मंटेनासोबत लग्न केलं होतं. मात्र 2018 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination