
Priyadarshini Indalkar Dashavatar Saree Photos: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्यदिव्य सिनेमा 'दशावतार' बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांकडून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षकांकडून सिनेमाचे कौतुक केले जातंय. रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने तब्बल 5 कोटी 22 लाख रुपयांचा गल्ला कमावलाय.
दशावतार सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद | Dashavatar Movie
'दशावतार'च्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील संस्कृती, परंपरा आणि लोककला पाहायला मिळतेय. कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. यासह सिनेमातील गाणी, देखावे आणि दिग्दर्शनातील भव्यता हे देखील सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. दशावतार चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलंय. तर सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. सिनेमामध्ये दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
(नक्की वाचा: Reshma Shinde Photos: 'जे मिनी सांगितलं ते Geminiने ऐकलं...' मराठी अभिनेत्रीची हटके पोस्ट)

Photo Credit: Priyadarshini Indalkar Instagram
यादरम्यान अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने दशावतार स्पेशल साडी लुकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit: Priyadarshini Indalkar Instagram
दशावतार नावासह वेगवेगळ्या देवसाधूसंताचे प्रिंट साडीवर दिसत आहे.
(नक्की वाचा: Dashavatar Movie Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'ची धूम! शोज हाऊसफुल्ल; किती झाली कमाई?)

Photo Credit: Priyadarshini Indalkar Instagram
पिवळा आणि क्रीम रंगाच्या साडीवर प्रियदर्शिनीने काळ्या रंगाचे स्लीव्हलेस ब्लाउज मॅच केलंय.

Photo Credit: Priyadarshini Indalkar Instagram
प्रियदर्शिनीने या लुकसाठी मोत्यांच्या दागिन्यांची निवड केलीय. केसांमध्ये माळलेल्या गजऱ्यामुळे तिचा लुक अधिकच खुलून दिसतोय.

Photo Credit: Priyadarshini Indalkar Instagram
प्रियदर्शिनी इंदलकरचा हा लुक देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय.
प्रियदर्शिनीचा दशावतार स्पेशल लुक तुम्हाला कसा वाटला, आम्हाला नक्की सांगा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world