
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या एका धाडसी कृतीमुळे चर्चेत आहे. प्रियदर्शिनीने नुकतेच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्कायडायव्हिंगचा थरारक अनुभव घेतला आहे. विमानातून उडी मारण्याचा हा अविस्मरणीय अनुभव तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
प्रियदर्शिनी इंदलकर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या रोमांचक अनुभवाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. प्रियदर्शिनीने पोस्टमध्ये लिहिलं की, "स्कायडायव्ह! विमानातून उडी मारली! भीतीदायक, अविस्मरणीय अनुभव. मी हे पुन्हा करेन."
तिने या थरारक अनुभवासाठी @skydiveaustralia आणि टँडम मास्टर 'बेन' (Tandem Master Ben) यांचे विशेष आभार मानले आहेत. एका वेगळ्या पोस्टमध्ये प्रियदर्शिनीने हा अनुभव तिच्यासाठी किती खास होता, हे व्यक्त केले आहे. तिने लिहिले, "एक अशी जागा जिथे मला एकटेपणा जाणवत नाही, एक अशी जागा जिथे मला घरी असल्यासारखे वाटते."
स्कायडायव्हिंगसारखा धोकादायक खेळ खेळण्याचे धाडस दाखवल्यामुळे प्रियदर्शिनी इंदलकर हिचे चाहते आणि सहकलाकार सोशल मीडियावर तिचे कौतुक करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world