जाहिरात

Sanchita Ugale: 'टॉर्चर, छळ, डिप्रेशन', संचिता उगले मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण, वडिलांनी सगळ सांगितलं

पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि जो कोणी तिच्या मानसिक छळाला कारणीभूत असेल त्याला कडक शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात इतर कोणत्याही मुलीवर अशी वेळ येणार नाही."

Sanchita Ugale: 'टॉर्चर, छळ, डिप्रेशन', संचिता उगले मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण, वडिलांनी सगळ सांगितलं

मनोज सातवी, प्रतिनिधी:

Sanchita Ugale Death: 'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया' या मालिका तसेच विक्की कौशची प्रमुख भूमिका साकारलेली कलाकार  संचिता उगले हिच्या मृत्यूमुळे टीव्ही तसेच चित्रपटसृष्टीत प्रचंड खळबळ माजली आहे. संचिताने आपल्या नालासोपाऱ्यातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. अशातच आता संचिताच्या आत्महत्येप्रकरणी तिची मावशी आणि वडिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 

तिच तारीख, तिच पद्धत; संचिता उगलेचा संबंध सुशांत सिंहच्या मृत्यूशी का जोडला जातोय? भावाचा धक्कादायक आरोप

"संचिता खूप चिंतेत आणि अपसेट असायची"

संचिताच्या मावशीने माध्यमांशी बोलताना अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, संचिता गेल्या २ ते ४ महिन्यांपासून खूप चिंतेत आणि अपसेट असायची. इंडस्ट्रीमधील कोणीतरी  तिला सतत मानसिक त्रास आणि टॉर्चर करत होता."तिने जर ही गोष्ट आधीच घरी सांगितली असती, तर आम्ही काहीतरी पाऊल उचलू शकलो असतो. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि जो कोणी तिच्या मानसिक छळाला कारणीभूत असेल त्याला कडक शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात इतर कोणत्याही मुलीवर अशी वेळ येणार नाही."

वडिलांना अश्रु अनावर 

संचिताच्या वडिलांनी अत्यंत भावूक होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की संचिता नेहमी आनंदी असायची, पण अचानक ती डिप्रेशनमध्ये जायची. हे लक्षात आल्यावर ते स्वतः तिच्यासोबत दररोज अप-डाऊन करायचे. त्यांनी आरोप केला की, कामाच्या ठिकाणी संचिताला पैशांच्या किंवा इतर काही कारणांमुळे सतत टॉर्चर आणि हॅमरींग (मानसिक दबाव) केले जात होते. "माझ्या मुलीला काय त्रास होता हे समोर आलेच पाहिजे. फक्त माझ्याच मुलीला नाही, तर देशातील सर्वच मुलींना न्याय मिळाला पाहिजे."

संचिताची सह-कलाकार जसिका हिने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जसिका म्हणाली की, संचिता अत्यंत मजबूत आणि सकारात्मक विचारांची मुलगी होती. ती नेहमी सगळ्यांशी मिळूनमिसळून वागायची. तिने असे काही पाऊल उचलले असेल यावर तिचा अजूनही विश्वास बसत नाहीये. संचिताच्या जाण्याने तिच्या संपूर्ण कुटुंबाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. पण हो, इंडस्ट्रीमधील कामाची पद्धत (Work System) नक्कीच सुधारायला हवी, जेणेकरून कलाकारांवर असा मानसिक दबाव येणार नाही."

नक्की वाचा - Video : 'त्यांनी भटक्या कुत्र्याचा जीव घेतला'; मराठी अभिनेत्री ओक्साबोक्शी रडली, न्यायाची केली मागणी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com