Mumbai News : 22 वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला आहे. करिअरमध्ये चांगली कामगिरी बजावत असताना संचितासोबत नेमकं असं काय घडलं की तिने टोकाचं पाऊल उचललं हा अनेकांना प्रश्न आहे. तिच्या आत्महत्येनंतर पोलीस विविध अंगाने तपास करीत आहेत. तिच्या मोबाइलमधले चॅटही तपासले जात आहे.
संचिता आणि उज्जवलचे धक्कादायक चॅट
दरम्यान अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्याप्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला असून आता सह कलाकार उज्ज्वल शर्मा याचे नाव चर्चेत आले आहे. संचिता उगलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत उज्ज्वल शर्मा नावाचा सह कलाकार तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. आर्थिक मदत घेतल्यानंतरही तो संचिता हिच्याशी अपमानास्पद भाषेत संवाद साधत होता, असे कथित चॅटमध्ये समोर आले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ‘साजन घर' मालिकेच्या सेटवर दोघे सहकलाकार म्हणून काम करीत होते. उज्ज्वलच्या वर्तनामुळेच संचिता हिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या सततच्या त्रासामुळे संचिता नैराश्यात गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची उज्ज्वल शर्मा याची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं आणि अशी घटना कोणत्याही मुली सोबत घडू नये मागणी कुटुंबीयांनी केली आहे. याप्रकरणी संचिता तिच्या मावशी सोबत NDTV मराठीने बातचीत केली. संचिताच्या मावशीने उज्ज्वल शर्माच्या चौकशीची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world