जाहिरात

तिच तारीख, तिच पद्धत; संचिता उगलेचा संबंध सुशांत सिंहच्या मृत्यूशी का जोडला जातोय? भावाचा धक्कादायक आरोप

१४ जूनच्या तारखेमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर या घटनेची तुलना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग यांच्या आत्महत्येच्या तारखेशी केली जात आहे.

तिच तारीख, तिच पद्धत; संचिता उगलेचा संबंध सुशांत सिंहच्या मृत्यूशी का जोडला जातोय? भावाचा धक्कादायक आरोप

Sanchita Ugale takes extreme step : नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे.

दरम्यान, १४ जूनच्या तारखेमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर या घटनेची तुलना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग यांच्या आत्महत्येच्या तारखेशी केली जात आहे. सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या १४ जून २०२० रोजी गळफास घेत स्वत:चा जीव संपवला. त्यानंतर संचिताने सहा वर्षांनी त्याच दिवशी आणि तशाच पद्धतीने स्वत:चा जीव घेतल्याने संचिताचा भाऊ आकाश उगले याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

संचिताच्या भावाचा काय आहे आरोप?

अभिनेत्री संचिताचा चुलत भाऊ आकाश उगले याने सांगितल्यानुसार, संचितावर इंडस्ट्रीतील बड्या लोकांकडून दबाव आणला जात होता. माझी बहीण संचिताचं इन्स्टाग्रामवर आणखी एका आयडीने तयार केलेलं अकाऊंट होतं. (अकाऊंटवर जाण्यासाठी इथं क्लिक करा) ज्यावर सुशांत सिंह राजपूत याचे अनेक व्हिडिओ आहेत. तेथे एका व्हिडिओमध्ये लिहिलंय, पुन्हा १४ जून... सुशांत सिंहने १४ जून २०२० मध्ये आत्महत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे संचिताने १४ जूनलाच आत्महत्या केली. सर्वसाधारण घरातून इंडस्ट्रीमध्ये आलेल्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असं म्हणत संचिताचे भाऊ भावुक झाले.

नक्की वाचा - Video : 'त्यांनी भटक्या कुत्र्याचा जीव घेतला'; मराठी अभिनेत्री ओक्साबोक्शी रडली, न्यायाची केली मागणी

'छावा' चित्रपटात साकारली ताराबाईची भूमिका... 

'कुमकुम भाग्य विधाता' या मालिकेत संचिता पूजाची भूमिका साकारत होती. याशिवाय 'वागले की दुनिया', 'दिलवाली दुल्हा ले जाएगी' या कार्यक्रमांमध्येही संचिता दिसली होती. मालिकांव्यतिरिक्त संचिताने २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'छावा'मध्येही काम केलं होतं. यामध्ये तिने ताराबाईची भूमिका साकारली होती.

मेहनतीने तिने कमी कालावधीत मोठं यश मिळवलं होतं. मात्र सर्वकाही अनुकूल असताना तिने हे पाऊल नेमकं का उचललं हे आम्हालाही कळत नसल्याचं तिच्या आजोबांनी सांगितलं. तरीही सोशल मीडिया पोस्ट, वैयक्तिक संपर्क, व्यावसायिक आयुष्य, मानसिक ताणतणाव आणि इतर सर्व शक्य बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त होत आहे. त्यामुळे उदयोन्मुख अभिनेत्रीच्या आत्महत्येचे नेमकं कारण काय आहे आणि याबाबत तपासाअंती नेमकं काय माहिती पुढे येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com