Smriti Irani Childhood Photo: यशाचं शिखर गाठण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मनोरंजन विश्वातही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी प्रचंड संघर्ष केला आणि आज स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज आपण अशाच एका खंबीर व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. आज त्या खूप प्रसिद्ध आहेत, पण त्यांचे बालपण मुळीच सोपे नव्हते. स्वतःचं घर चालवण्यासाठी अवघ्या सात वर्षांच्या असताना त्यांना आपल्या आईसोबत घर सोडावे लागले होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण नवी दिल्लीत पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
1998च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग
या कलाकाराच्या वडिलांचे नाव अजय कुमार मल्होत्रा आणि आईचे नाव शिबानी बागची आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मनोरंजन क्षेत्रात मॉडेलिंगपासून केली आणि 1998 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही सहभाग घेतला. पुढे वर्ष 2000 मध्ये 'हम हैं कल आज कल और कल' या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. त्या 15 वर्षे टीव्ही इंडस्ट्रीचा भाग होत्या आणि आपण सर्वजण त्यांना टीव्हीची 'सर्वात आदर्श सून' म्हणून ओळखतो. त्यांचं नाव आहे तुलसी विरानी म्हणजेच स्मृती इराणी.
(नक्की वाचा: Aai Bhadyane Havi? Movie: 'आई भाड्याने हवी?' केदार शिंदे आणि सना शिंदेचा नेमका विषय काय?)
'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील तुलसीच्या भूमिकेने जिंकली मने
हो, आपण स्मृती इराणी यांच्याबद्दलच बोलत आहोत. एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतील त्यांनी साकारलेली तुलसी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. प्रेक्षकांच्या मनामध्ये तुलसीने कायमचे स्थान निर्माण केलंय. त्यांनी 'थोडी सी जमीन थोडा सा आसमान' या मालिकेची सह-निर्मिती देखील केली आहे. तसेच त्यांनी 'ये है जलवा' नावाचा शो होस्ट केला आहे.
(नक्की वाचा: Jhimma 3 Release Date: 'यावेळी तिसराच आहे!' झिम्मा 3चं नेमकं सीक्रेट काय? सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर)
कोट्यवधींची संपत्ती
स्मृती इराणी 'रामायण', 'विरुद्ध', 'तीन बहुरानियां', 'मनीबेन.कॉम' यासारख्या अनेक मालिकांचा भाग राहिल्या आहेत. आता त्या राजकारणात सक्रिय आहेत. वर्ष 2003 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांची एकूण संपत्ती साधारण 17.4 कोटी रुपये आहे. त्यांच्या खासगी आयुष्याबाबत सांगायचे झाले तर, त्यांनी झुबिन इराणी यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना जोहर आणि जोईश ही दोन मुले आहेत. स्मृती या झुबिन यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world