Dhurandhar 2 latest News Update : रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर:द रिवेंज'बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला आहे. चित्रपटाने रिलीज झाल्यापासून पाच दिवसांतच जवळपास 454 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. एकीकडे चित्रपटाचा क्रेझ वाढत असताना, सोशल मीडियावर चित्रपटाच्या क्लिप्सही व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटातील छोट्या-मोठ्या चुकांकडे प्रेक्षकांनी लक्ष वेधलं असून एक्सवर एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. आदित्य धर यांनी दिग्दर्शीत केलेल्या या चित्रपटातील बारीक सारीक गोष्टींकडे समीक्षकांचंही लक्ष लागलं आहे. या चित्रपटाली एका फाईट सीनमधील एक छोटासा क्षण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
हमजा आणि पिंदाच्या फायटिंगवेळी कॅमेरामन दिसला
या सीनमध्ये हमजाच्या भूमिकेत असलेला रणवीर सिंग त्याच्या बालपणीच्या मित्रासोबत लढाई करतो.दोघांमध्ये वादविवाद होतो आणि काही वेळानंतर हा वाद विकोपाला जातो. जस जसं हा सीन पुढे जातो, रणवीरच्या चेहऱ्याच्या एका क्लोज अप शॉटमध्ये एक चूक स्पष्टपणे दिसते. फ्रेमचं शुटिंग करताना एक कॅमेरामन स्पष्टपणे दिसतो. या छोट्याशा चुकीमुळे इंटरनेटवर चर्चांना उधाण आलं आहे. अनेक लोक चर्चा करत आहेत की, ही खरंच एक चूक आहे की व्हायरल व्हिडीओत एखादा तांत्रिक बिघाड आहे..काही यूजर्सने या व्हिडीओच्या सत्यतेबाबतच सवाल उपस्थित केला आहे. काही लोकांना वाटतंय की, हा व्हिडीओ एआयने बनवला आहे. तर काही लोक म्हणतायत की, फ्रेममध्ये दिसणारा व्यक्ती सिनेमॅटोग्राफर विकास नौलखा असू शकतो.
नक्की वाचा >> महिलांकडून महिलांसोबत घाणेरडे चाळे, मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुरू आहे भयानक प्रकार; Instagram वर खळबळजनक व्हिडीओ
चित्रपटाच्या स्टोरीबाबतही काही त्रुटी समोर
या फाईट सीन शिवाय प्रेक्षकांनी एक टँकरच्या सीनमध्येही चूक शोधून काढली आहे.चित्रपटाच्या टाईमलाईननुसार वर्ष दाखवण्याऐवजी,2026 वर्ष दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या स्टोरीबाबतही काही त्रुटी समोर आल्या आहेत. चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये गौरव गेरा म्हणजे आलम, रिझवान (मुस्तफा अहमद) आणि हमजा अली मजारी (रणवीर सिंग) पहिल्यांदाच त्याच्या ज्युसच्या दुकानावर भेटतो. त्यावेळी रिझवान, अर्शद पप्पूच्या गँगचा सदस्य असतो.

दरम्यान, चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये या दोन्ही सदस्यांना ल्यारीच्या गँग नेटवर्कमध्ये सामील होण्याआधी एकत्र ट्रेनिंग करताना दाखवण्यात आलं आहे. यामुळे चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, जर ते पहिल्यापासूनच एकमेकांना ओळखत होते, तर चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये (जी चित्रपटानुसार आधीची वेळ आहे) ते एकमेकांसोबत अनोळखी व्यक्तींसारखे वागतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world