जाहिरात

अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्त्व का घेतलं होतं? अचानक सोडण्याचाही घेतला निर्णय, पण कारण काय?

अभिनेता अक्षय कुमारने कॅनडा कुमार म्हणून सतत ट्रोल होत असताना अचानक त्याने आयुष्यातील मोठा निर्णय घेतला.

अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्त्व का घेतलं होतं? अचानक सोडण्याचाही घेतला निर्णय, पण कारण काय?

बॉलिवूड म्हटलं की, काही ठराविक कलाकारांचे चेहरे आपोआप डोळ्यासमोर येतात. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. जसं की, बिग बि-अमिताभ बच्चन, बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार, आणि असे अनेक कलाकार आहेत. या सर्व कलाकारांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. अनेकदा या कलाकारांच भरभरून कौतुक होताना पहायला मिळतं. अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादातही अडकतात. तर अनेकदा ट्रोल झालेले पहायला मिळतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमार जरा जास्तच ट्रोल होत होता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बॉलिवूड फेम अक्षय कुमार गेल्या काही वर्षांपासून दुसरं तिसरं काही नाही तर, त्याच्या नागरिकत्वावरून सतत ट्रोल होत होता. काही वर्षांपूर्वी त्याने कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. त्यामुळे त्याच्या प्रत्येक चित्रपटावेळी काही ट्रोलर्सकडून त्याला सातत्याने ट्रोल केले जात होते. गेल्याच वर्षी अक्षयने पुन्हा एकदा भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आहे. 

नुकत्याच एका मीडिया इव्हेंटमध्ये त्याने सांगितलं की,  गेल्याच वर्षी त्याने कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आहे. भारतीय पासपोर्ट ही बनवला आहे. यादरम्यान त्याने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले याबाबत सांगितले. अक्षय म्हणाला की, तो बऱ्याच दिवसांपासून भारतीय नागरिकत्व घेत, कॅनडाचे नागरिकत्व सोडण्याचा प्लान करत होता. याचं एकमेव कारण म्हणजे देशावरील प्रेम. तो एक भारतीय असून, देशभक्त ही आहे. 

Nayantara Letter : अभिनेत्री नयनताराचं धनुषसाठी 3 पानी पत्र, मजकूर वाचून सर्वांनाच धक्का बसला

(नक्की वाचा: Nayantara Letter : अभिनेत्री नयनताराचं धनुषसाठी 3 पानी पत्र, मजकूर वाचून सर्वांनाच धक्का बसला)

कॅनडाचं नागरिकत्व का स्वीकारलं होतं?

'हिन्दुस्तान टाईम्स लिडरशिप समिट' मध्ये अक्षय कुमारला कॅनडाच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याने कोविडच्या काळात कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अप्लाय केलं होतं. याचं कारण सांगताना अक्षय म्हणाला की, एक वेळ अशी होती जेव्हा त्याचे चित्रपट चांगले चालत नव्हते आणि त्याला कामाची गरज होती. त्यादरम्यान त्याच्या एका मित्राने त्याला कॅनडामध्ये कार्गोचे काम मिळवून देण्याबाबत सांगितलं होतं. 

Rohit Sharma : मुलाच्या जन्मानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, शेअर केला खास Photo

 (नक्की वाचा: Rohit Sharma : मुलाच्या जन्मानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, शेअर केला खास Photo)

अक्षय कुमारने जेव्हा कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले त्यावेळी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि ते हीट ही झाले. त्यानंतर त्याने अनेक हीट चित्रपट दिले. आणि कॅनडाच्या नागरिकत्वाबद्द्लचा विचारच सोडून दिला. त्याचबरोबर अक्षय म्हणाला, 'मी मनाने आणि आत्म्याने एक भारतीय आहे आणि नेहमीच असेल. म्हणूनच मी याआधी कधीच याची पर्वा केली नाही. पण 3-4 वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, मी माझं परदेशी नागरिकत्व सोडणार आहे. त्याने सांगितलं की, याला थोडा वेळ लागला, पण गेल्या वर्षी 14, 15 ऑगस्टला त्याचा भारतीय पासपोर्ट मिळाला आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com