जाहिरात

पत्नीने अल्लु अर्जुनला मारली घट्ट मिठी, अन् भावनांचा बांध फुटला; भावुक करणारा VIDEO VIRAL 

Allu Arjun Sneha Reddy Video: 'पुष्पा 2' स्टार अल्लु अर्जुनची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळेस त्याची पत्नी स्नेहा रेड्डी अतिशय भावुक झाली होती.  

पत्नीने अल्लु अर्जुनला मारली घट्ट मिठी, अन् भावनांचा बांध फुटला; भावुक करणारा VIDEO VIRAL 

Allu Arjun Sneha Reddy Video: 'पुष्पा 2'चा सुपरस्टार अल्लु अर्जुनची शनिवारी (14 डिसेंबर) सकाळी तुरुंगवासातून सुटका झाली. संध्या थिएटर चेंगराचेंगरीमध्ये महिलेच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी शुक्रवारी (13 डिसेंबर) त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर त्याचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यादरम्यानच अल्लु अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डीचा आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. स्नेहा आणि अल्लुचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वरील व्हिडीओमध्ये स्नेहा रेड्डी पती अल्लु अर्जुनची घराबाहेर वाट पाहताना दिसतेय. यावेळेस त्यांची मुले देखील सोबत दिसताहेत. अल्लु अर्जुनकडे पोहोचताच स्नेहा रेड्डी त्याला घट्ट मिठी मारते आणि त्यावेळेस तिला रडू कोसळते. हा व्हिडीओ पाहून चाहते देखील भावुक झाले आहेत.   

(नक्की वाचा: शाहरुख खानच्या त्या गोष्टीमुळे अल्लु अर्जुनची जेलमधून सुटका, जाणून घ्या INSIDE STORY)

अल्लु अर्जुनला शुक्रवारी (13 डिसेंबर) त्याच्या घरातून अटक करण्यात आली, त्यावेळेसही स्नेहा रेड्डी त्याच्यासोबत होती. यावेळेस अभिनेता पत्नीला बळ देताना दिसला. कॉफी प्यायल्यानंतर तो पोलिसांसोबत निघाला. व्हिडीओमध्ये अभिनेता पोलिसांना म्हणताना दिसतोय की,"आता आपण जाऊ शकतो, सर माझी कॉफी पिऊन झालीय". पण जेव्हा पोलीस म्हणतात की त्यांनी अल्लुच्या प्रत्येक मागणीचा आदर केला, तेव्हा अल्लुने उत्तर दिले की,"सर तुम्ही काहीही आदर केला नाही. मी तुम्हाला म्हटलं की मला कपडे बदलायचे आहेत आणि एका व्यक्तीला तुम्ही सोबत पाठवू शकता. मला घेऊन जाणे चुकीचे नाहीय, पण माझ्या बेडरूमपर्यंत येणे अति होते, हे योग्य नाही".

(नक्की वाचा: Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर राजकारण तापलं, वरुण-चिरंजीवी 'पुष्पा' साठी धावले)

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लु अर्जुनने चाहत्यांचे आभार मानले. तुमचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला, यासाठी धन्यवाद. अल्लु अर्जुनला तेलंगाणा हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. पण तरीही अल्लुला तुरुंगात एक रात्री काढावी लागली. कारण कारागृह अधिकाऱ्यांना शुक्रवारी उशीरा रात्रीपर्यंत जामीनाची प्रत मिळाली नाही. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com