
Amisha Patel VIDEO Viral: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलला मुंबईत नुकताच एका विचित्र आणि मजेशीर प्रसंगाला सामोरं जावं लागलं. सेलिब्रिटींना बघून त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी होणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु अमिषा पटेलसोबत घडलेला प्रकार थोडा वेगळा होता. अमिषा पटेल मुंबईत एका ठिकाणी स्पॉट झाली असताना, ती गाडीतून उतरताच तिचा एक चाहता तिच्याजवळ धावला आणि त्याने तिच्याकडे सेल्फीची मागणी केली.
अभिनेत्री सेल्फीसाठी उभी राहिली, पण ऐनवेळी चाहत्याच्या मोबाईलमध्ये कॅमेराच सुरू होईना. तो चाहता कॅमेरा सुरू करण्यासाठी मोबाईलमध्ये पाहत बसला. चाहत्याचा हा गोंधळ बघून अमिषा पटेल काही सेकंद तिथेच उभी राहिली. पण कॅमेरा सुरू होत नाही हे पाहताच, अमिषा पटेलने तिथे न थांबता पुढे निघून गेली. यामुळे सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाहत्याचा मोठा हिरमोड झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा VIDEO
अमिषा पटेल आणि तिच्या चाहत्याचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या. एका युजरने म्हटले की, "भावाला सेल्फी नाय, अख्खा व्हिडीओ मिळाला." दुसऱ्या एका युजरने चाहत्याच्या अवस्थेवर टिप्पणी करताना म्हटले की, "भाऊ म्हणू शकतो की अमिषा बाजूला असतानाही मी मोबाईलमध्ये व्यस्त होतो."
एका युजरने म्हटलं की, "याच कारणामुळे मी अँड्रॉइड मोबाईल वापरत नाही". आणखी एकाने लिहिलं की, "आता बातमीतच आला, मग सेल्फीची काय गरज आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world