Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच आज निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी आशा ताईंनी शेवटचा श्वास घेतला. आशा ताईंनी ८ दशकात हजारो गाजी गायली. आजही त्यांचा आवाज त्यांची गाणी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. आशा भोसले यांची बहीण लता मंगेशकर यांच्यातील नात्याबद्दलच्या चर्चा नेहमीच रंगत आल्या आहेत. दरम्यान एक गाण्यामुळे दोघींमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. सुरुवातीला आशा भोसले आणि लता मंगेशकर दोघीही मिळून हे गाणं गाणार होत्या. मात्र चार भिंतीत असं काही घडलं की, आशा भोसले रडत रडत बाहेर पडल्या आणि शेवटी लता मंगेशकरांनी एकटीने ते गाणं गायलं.
त्या चार भिंतीत नेमकं काय घडलं?
आशा भोसले आणि लता मंगेशकर यांचे अनेक कडू गोड किस्से आहेत. मात्र एक असा किस्सा जो आजवर कोणालाही माहीत नव्हता. 'ए मेरे वतन के लोगो' हे अजरामर गाणं आधी आशा भोसले आणि लता मंगेशकर मिळून गाणार होत्या. पण सराव करत असताना दोघींमध्ये कोणत्या तरी कारणावरुन वाद झाल्याची शक्यता आहे. याचा परिणाम असा झाला की, आशा भोसले रडत रडत बाहेर पडल्या आणि हे गाणं सोडल. 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणं प्रदीप यांनी लिहिलं आहे.
त्यांची मुलगी मितुल प्रदीप यांनी त्यावेळेसचा किस्सा सांगितला. सरावादरम्यान आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी हे गाणं एकत्र गायलं. दोघींनीही हे गाणं एकत्रितपणे गावं अशीच बाबांची इच्छा असल्याचं मितुल प्रदीप यांनी सांगितलं. मात्र दोघींमध्ये असं काहीतरी घडलं की आशा ताई तेथून रडतच निघून गेल्या, शेवटी लता मंगेशकर यांनी एकटीने ते गाणं गायलं. दोघी बहिणींमध्ये प्रचंड प्रेम होतं, मात्र जेव्हा गाणं यायचं तेव्हा दोघींमध्येही स्पर्धा होती, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world