जाहिरात

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस विजेता सुरज चव्हाणची श्रीवल्ली, मिस्ट्री गर्लचा Video Viral

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सुरज चव्हाणच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एण्ट्री झालीय का, कोण आहे मिस्ट्री गर्ल?

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस विजेता सुरज चव्हाणची श्रीवल्ली, मिस्ट्री गर्लचा Video Viral
"Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: सुरज चव्हाणची मिस्ट्री गर्ल कोण आहे?"

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan:  सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सुरज चव्हाण कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो. बिग बॉस मराठी रिअ‍ॅलिटी शोमुळे त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. नुकतेच सुरजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 17 सप्टेंबर रोजी त्याने एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. याच मिस्ट्री गर्लसोबतचा त्याने आता व्हिडीओ पोस्ट केलाय. पण व्हिडीओमध्ये त्याने तरुणीचा चेहरा दाखवणे टाळलंय. त्यामुळे ही तरुणी नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 

सुरज चव्हाणचा साउथ इंडियन स्टाइल पेहराव

सुरज चव्हाण आणि त्याच्यासोबत असणाऱ्या तरुणीने साउथ इंडियन स्टाइल पेहराव परिधान केलाय. सुरजने पुष्पा सिनेमातील डायलॉगवर त्याने डबस्मॅश केलंय. पण त्याची श्रीवल्ली कोण आहे, हे कळत नाहीय. कारण व्हिडीओमध्ये तिचा चेहरा दिसत नाहीय. बिग बॉसमध्ये असताना सुरजने अनेकदा त्याच्या प्रेमभंगाबाबतचा उल्लेख केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा सुरजच्या जीवनात प्रेमाची एण्ट्री झालीय का? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान सुरज या तरुणीसोबत लग्न करणार आहे का? की हा केवळ एक रीलचा भाग आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं युजर्संना जाणून घ्यायची आहेत. 

'बिग बॉस मराठी 5'मध्ये असताना सुरजचा 'गुलीगत धोका', 'गुलीगत टेंगूळ' हे डायलॉगही लोकप्रिय झाले होते. त्याच्या झापुक झुपूक डान्स स्टेपही लोकांना प्रचंड आवडली होती. 

Priya Marathe News: 'ते रुप कोणी पाहावे अशी तिची इच्छा नव्हती...' प्रिया मराठेचा संघर्ष सांगताना अभिजीत खांडकेकर भावुक

(नक्की वाचा: Priya Marathe News: 'ते रुप कोणी पाहावे अशी तिची इच्छा नव्हती...' प्रिया मराठेचा संघर्ष सांगताना अभिजीत खांडकेकर भावुक)

Google Gemini Trend: सर्वजणी पडल्या असत्या फिक्या इतकी सुंदर अभिनेत्री, एकाच सिनेमात झळकली अन्...पुढे काय झालं

(नक्की वाचा: Google Gemini Trend: सर्वजणी पडल्या असत्या फिक्या इतकी सुंदर अभिनेत्री, एकाच सिनेमात झळकली अन्...पुढे काय झालं)

सुरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा

'बिग बॉस मराठी 5' शो जिंकल्यानंतर सुरज चव्हाणने मोठ्या पडद्यावरही एण्ट्री केली होती. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'झापुक झुपूक' सिनेमामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. पण सुरजच्या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Suraj Chavan Instagram

Listen to the latest songs, only on JioSaavn.com