जाहिरात

सूरज चव्हाणने सांगितले कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कसा दिसतो, ऐका काय म्हणाला VIDEO

Ankita PrabhuWalawalkar Husband: बिग बॉसच्या घरामध्ये एण्ट्री करण्यापूर्वी कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने आयुष्याच्या जोडीदाराची निवड केली असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून अंकिताचा नवरा कोण आहे? याचे उत्तरं जाणून घेण्यासाठी तिचे फॉलोअर्स आतूर झाले आहेत. 

सूरज चव्हाणने सांगितले कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कसा दिसतो, ऐका काय म्हणाला VIDEO

Ankita PrabhuWalawalkar Husband: 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता सूरज चव्हाणसह अन्य स्पर्धक देखील वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या चर्चेत आहेत. 'बिग बॉस मराठी 5'चा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला दणक्यात पार पडला. यंदाच्या सीझनमध्ये गुलीगत स्टार सूरज चव्हाणने बाजी मारून बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले. ग्रँड फिनालेनंतर या मंडळींचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान अंकिता प्रभू वालावलकरचाही एक व्हिडीओ सध्या चर्चेच आहे. या व्हिडीओमुळे अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण जिंकला, पण अभिजीत सावंत झाला मालामाल, कोणी किती पैसे कमावले? 

(नक्की वाचा: Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण जिंकला, पण अभिजीत सावंत झाला मालामाल, कोणी किती पैसे कमावले?)

अंकिता प्रभू वालावलकर कधी करणार लग्न?

बिग बॉसच्या घरामध्ये एण्ट्री करण्यापूर्वी अंकिताने 29 जुलैला इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये तिने लग्न आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबतची माहिती लिहिली होती. त्यामुळे अंकिता नवरा कसा दिसतो? तो नेमके काय करतो? त्याचे नाव काय आहे? यासह कित्येक प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न तिच्या चाहत्यांनी केला. पण इतका शोध घेतल्यानंतर त्यांच्या हाती काहीही लागले नाही. पण नुकतेच अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि बिग बॉसमधील तिच्या ग्रुपमधील सदस्यांची भेट घडवून दिली. अंकिताचा नवरा कसा दिसतो, याची माहितीही सूरजने सांगितली.

अंकिताचा होणारा नवरा कसा दिसतो? सूरजने सांगितले...

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर अंकिता आणि सूरज चव्हाणची भेट झाली. तिने एक व्हिडीओ देखील शूट केला. यावेळेस अंकिताने सूरज चव्हाणला दाजी कसा दिसतो? असा प्रश्न विचारला. यावर सूरज म्हणाला की, 'एकदम भारी दिसतो'. या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला, वाचा सविस्तर... 

(नक्की वाचा: Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता)

सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू वालावलकरमधील संवाद 

अंकिता : आता काय तू अंकिता ताईला विसरला रे ! 
सूरज : नाही नाही 
अंकिता : बघा बघा झापुक झुपूक विसरलाय मला... 
बाबा आम्ही आता बिग बॉसच्या विनरसोबत जेवतोय, अहो भाग्य आमचे... 
सूरज दाजी कसा दिसतो?
सूरज : भारी दिसतो !
अंकिता : कोणाक सांगू नको हा आता...
सूरज : मी नाही कोणाला सांगणार, लपवून ठेवतो हा...

Previous Article
हार्दिकसोबतच्या घटस्फोटातनंतर नताशानं सुरु केलं काम, कृणाल पांड्याची प्रतिक्रिया Viral
सूरज चव्हाणने सांगितले कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कसा दिसतो, ऐका काय म्हणाला VIDEO
dhruv rathee react on Singham Again movie trailer bollywood news ajay devgn
Next Article
Singham Again सिनेमाच्या ट्रेलरची ध्रुव राठीने घेतली फिरकी, ट्वीट करत म्हणाला...