जाहिरात

Bigg Boss OTT 3 : कलाकार ते यूट्यूबर्स सर्व 13 स्पर्धक ठरले, पाहा संपूर्ण यादी

Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटी सिझन 3 यंदा सलमान खान नाही तर अनिल कपूर होस्ट करणार आहे. 21 जूनपासून जियो सिनेमावर हा शो दाखवण्यात येईल. यामधील सर्व स्पर्धक ठरले आहेत.

Bigg Boss OTT 3 : कलाकार ते यूट्यूबर्स सर्व 13 स्पर्धक ठरले, पाहा संपूर्ण यादी
Bigg Boss OTT 3 सिझन सुरु होण्याच्या एक दिवसपूर्वीच सर्व स्पर्धकांची यादी समोर आली आहे.
मुंबई:

बिग बॉस ओटीटी सिझन 3 यंदा सलमान खान नाही तर अनिल कपूर होस्ट करणार आहे. 21 जूनपासून जियो सिनेमावर हा शो दाखवण्यात येईल. या सिझनमधील सर्व स्पर्धक प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज आहेत. बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये कोणते स्पर्धक असणार याची अनेकांना उत्सुकता असते. आत्तापर्यंत फक्त दिल्लीची वडा पाव गर्ल चंद्रिका हे एकच नाव कन्फर्म असल्याची माहिती समोर आली होती. पण, इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार या शो मधील कन्फर्म स्पर्धकांची यादी निश्चित झालीय. त्यामध्ये कलाकारपासून ते यूट्यूबर्सपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बिग बॉसच्या या सिझनमध्ये सहभागी होणारा पहिला स्पर्धक आहे सई केतन राव. टीव्ही मालिका नियमित पाहणाऱ्यांसाठी हा ओळखीचा चेहरा आहे. केतननं आत्तापर्यंत मेहंदी है रचने वाली, चाशनी आणि इमली या मालिकांमध्ये काम केलंय. 

पॉलमी पोलो दास हे दुसरं नाव आहे. पॉलमीनं 2016 मध्ये इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल शोच्या माध्यमातून कारकीर्द सुरु केली. त्यानंतर 'सुहानी सी एक लडकी', 'दिल ही तो है' आणि 'कार्तिक पूर्णिमा'मध्ये ती दिसली होती. 

टिकटॉक कंटेट क्रिएटर आणि मॉडल सना सुल्तान ही तिसरी स्पर्धक आहे. सना आत्तापर्यंत वेगवेगळ्या पंजाबी म्युझिक व्हिडओमध्ये दिसलीय. या सिझनमधील चौथी स्पर्धक आहे अभिनेत्री सना मकबूल.  'कितनी मोहब्बत है 'इस प्या को क्या नाम दूं' या मालिकांमध्ये तुम्ही सर्वाांनीच सनाला पाहिलं असेल. 

अभिनेत्रीप्रमाणेच इन्सफ्लूएन्सर शिवानी कुमार देखील बिग बॉस ओटीटी सिझन 3 मध्ये असेल. उत्तर प्रदेशच्या शिवनीचे इन्स्टाग्रामवर 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्फ्लूएन्सर विशाल पांडे हा सहावा स्पर्धक आहे. त्याच्या फॅन्सची संख्याही मोठी आहे. 

ट्रेंडींग बातमी - अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का
 

सातवी स्पर्धक आहे चंद्रिका गेरा दीक्षित ही सातवी स्पर्धक आहे. चंद्रिका दिल्लीची वडा पाव गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. गायक नेजी हा आठवा स्पर्धक आहे. नेजी हा रॅपर देखील असून तो रणवीर सिंहच्या 'गली बॉय'चा फॅन आहे. कुस्तीपटू नीरज गोयत हा नववा स्पर्धक आहे. तर ज्येष्ठ पत्रकार दीपक चौरासिया हे दहावे स्पर्धक आहे. कुछ रंग प्यार के मधील अभिनेत्री चेष्ठा भगत देखील या सिझनमध्ये सहभागी होणार आहे. ती अकरावी स्पर्धक आहे. तर डीजे आणि रियलिटी शोचा कलाकारप निखिल मेहता हा बारावा स्पर्धक आहे. 

13 वं आणि शेवटचं नाव अभिनेत्री आणि टॅरो कार्ड रीडर मुनीषा खाटवानी हे आहे. अर्थात ही सर्व नावं अधिकृत आहेत की नाही हे तर शो ऑन एअर झाल्यानंतरच कळेल. 

ट्रेंडींग बातमी - गायिका अलका याज्ञिकला दुर्मिळ आजार, दोन्ही कानांवर गंभीर परिणाम
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
अमिताभ आज पण 'सिकंदर' पण फोटोतले 'ते' 3 जण गायब, जाणून घ्या पद्मिनी, राजदूत, चेतकची कहाणी
Bigg Boss OTT 3 : कलाकार ते यूट्यूबर्स सर्व 13 स्पर्धक ठरले, पाहा संपूर्ण यादी
will-sonakshi-sinha-convert-to-islam-after-marriage-with-zaheer-iqbal
Next Article
सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालशी लग्न केल्यानंतर धर्म बदलणार? होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं उत्तर