Bol Bol Rani Movie : सुबोध, सई आणि चिन्मय 15 वर्षांनंतर 'या' सिनेमामध्ये पुन्हा एकत्र झळकणार 

Bol Bol Raani Movie : मराठी सिनेस्टार सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

Bol Bol Raani Movie : मराठी सिनेस्टार सुबोध  भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. 'बोल बोल राणी' या नव्या कोऱ्या सिनेमाच्या माध्यमातून हे तिगडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. नुकतेच सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे तब्बल 15 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. सिड विंचुरकर दिग्दर्शित या सिनेमाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत. 

प्रेक्षकांच्या भेटीला येतोय थ्रिलर चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार,आशयपूर्ण सिनेमे देऊन मराठी सिनेमाला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रॉडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच न्यूझीलंड मोशन पिक्चर्सचे सिड विंचुरकर मराठी प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

माझा पहिला सिनेमा मराठीच असेल हे ठरवलं होतं - सिड विंचुरकर

दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात,"मराठी चित्रपट आता जगभरात पोहोचत आहे. मुळात मराठी भाषेत उत्तमोत्तम विषय हाताळले जात असल्याने ते जगभरातील प्रेक्षकांना भावतात. मी स्वतः परदेशात असताना मराठी चित्रपट आवर्जून पाहायचो. मराठी भाषेला समृद्ध साहित्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे चित्रपटांमध्ये वैविध्य जाणवते. चित्रपटाची निर्मिती करणे हे माझे पॅशन आहे आणि म्हणूनच मी भारतात आलो. मी माझा पहिला चित्रपट हा मराठी भाषेतच करणार, हे ठरवले होते. लवकरच 'बोल बोल राणी' प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यात या सिनेमात तीन मोठे कलाकार एकत्र झळकणार आहेत". 

(नक्की वाचा: 'या' चित्रपटामुळे अजय देवगणला बसला जोरदार धक्का, 100 कोटीच्या चित्रपटाने कमावले फक्त...)

माझ्या कौशल्याचा कस लागणारी भूमिका - सई ताम्हणकर

सई ताम्हणकर म्हणाली,"माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या. पण खूप छान टीम एकत्र आल्याने आम्ही ही आव्हाने उत्तमरित्या पेलली. अपूर्वा आणि मी 'दुनियादारी'पासून एकत्र आहोत आणि ती एक उत्तम एडिटर आहे. हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे. तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी, असे मला वाटते. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय. भविष्यातही त्याच्यासोबत काम करेन, अशी आशा आहे. कारण मला त्याच्या कामाची पद्धत विशेष आवडली आहे. भूमिका, चित्रपटाबाबत जास्त काही बोलणार नाही, पण माझा कस लागला होता.''

(नक्की वाचा: उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाची चर्चा! कोण आहे तिचा नवरा मोहसीन अख्तर मीर?)

सुबोध भावे म्हणतात की,"अपूर्वाचे निर्मिती क्षेत्रात आणि सिडचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. या दोघांनीही ज्या पद्धतीचा विषय निवडला आहे, तो अत्यंत धाडसी विषय आहे. गेली दोन-तीन वर्ष या चित्रपटावर काम सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टी खूप स्पष्ट होत्या आणि म्हणूनच चित्रिकरणात नेमकेपणा होता. अतिशय उत्तम व्यवस्थापन होते. मी चित्रपट पाहायला खूप उत्सुक आहे. मला आनंद आहे की, मी या चित्रपटाचा एक भाग आहे."

(नक्की वाचा: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत)

चिन्मय मांडलेकर म्हणाला की, "मी नुकतंच 'बोल बोल राणी' या सिनेमाचे शुटिंग पूर्ण केले आहे. बऱ्याच वर्षांनी सुबोध, सई आणि मी एकत्र काम केले. आमची चांगलीच भट्टी जमली आहे. थोडा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. तर अपूर्वाला मी ओळखतो परंतु निर्माती म्हणून मी तिच्यासोबत पहिल्यांदाच काम करतोय. दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता." 

Topics mentioned in this article