
विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपटही ऑस्करच्या स्पर्धेत सामील झाला आहे. या चित्रपटासाठीचे नामंकन भारताने पाठवले आहे. 2025 साली ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. भारतातर्फे या पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्यात येत असून यापूर्वी लापता लेडीज हा चित्रपटाचे नामांकनही या पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा याने सावरकरांची भूमिका साकारली होती. रणदीपनेच या चित्रपटाचे दिग्दगर्शन केले आहे. ऑस्करसाठी नामांकन पाठवण्यात आल्यानंतर रणदीप हुड्डा, निर्माते आनंद पंडीत आणि संदीप सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा क्षण फक्त आमच्यासाठीच नाही तर त्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे जे आपल्या वीरांच्या कथा अभिमानाने सांगतात.
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत, रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'सह 29 चित्रपटांना टाकलं मागे
या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली होती. दिग्दर्शन आणि अभिनय अशा दुहेरी जबाबदाऱ्या त्याने सांभाळल्याच शिवाय सावरकरांची छबी मोठ्या पडद्यावर उभी करण्यासाठी त्याने वजनही कमी केले होते. त्याने या चित्रपटाबाबत बोलताना म्हटले होते की, भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना दाखवणाऱ्या या चित्रपटाचा एक भाग बनता येणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. ज्यांच्या वीरकथा आपण विसरलो होतो त्यांच्या गाथा लोकांपुढे नव्याने मांडण्याचा हा प्रयत्न होता. निर्माते संदीप सिंह यांनी म्हटले की या चित्रपटाचा प्रवास आव्हानात्मकही होता आणि मनाला समाधान देणाराही होता. ऑस्करसाठी या चित्रपटाला नामांक मिळणे ही , चित्रपटासाठी झटलेल्या प्रत्येकाच्या कामाला मिळालेली पोचपावती आहे.
Ashok Saraf: महाराष्ट्राचा महानायक परत येतोय, अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकांनी 'लापता लेडीज' चित्रपटालाही शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट भारतातर्फे 'सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट' या विभागासाठी नामांकीत करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हा एक ऐतिहासिक बायोपिक असून यामध्ये स्वातंत्र्यवीरांचा जीवनपट दाखवण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते आणि त्यांनी आपले आयुष्य हे स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ओवाळून टाकले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world