जाहिरात

Virat Kohli Favourite Movie: विराट कोहली मॅचपूर्वी मनःशांतीसाठी पाहतो हा कॉमेडी सिनेमा; डायलॉग्सही तोंडपाठ

Virat Kohli Favourite Movie: विराट कोहलीला राजपाल यादवचा 'हा' फ्लॉप ठरलेला कॉमेडी सिनेमा आहे प्रचंड आवडता. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सांगितला खास किस्सा, वाचा सविस्तर बातमी...

Virat Kohli Favourite Movie: विराट कोहली मॅचपूर्वी मनःशांतीसाठी पाहतो हा कॉमेडी सिनेमा; डायलॉग्सही तोंडपाठ
"Virat Kohli Favourite Movie: विराट कोहलीचा आवडता कॉमेडी सिनेमा"

Virat Kohli Favourite Movie: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजपाल यादव यांनी 16 मार्च रोजी आपला 54वा वाढदिवस साजरा केला. आपल्या अनोख्या कॉमिक टायमिंग आणि हावभावांमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये अशी ओळख निर्माण केली आहे की, त्यांची छोटीशी भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते. 'चुप चुप के', 'भूल भुलैया', 'ढोल' आणि 'फिर हेरा फेरी' यासारखे अनेक सिनेमांमध्ये त्यांनी धमाल कॉमेडी केलीय. वनडे क्रिकेटमध्ये 14,797 धावा करणाऱ्या टीम इंडियाचा स्टार बॅटर विराट कोहलीलाही राजपाल यादवचा असा एक सिनेमा प्रचंड आवडतो, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता, पण प्रेक्षकांमध्ये आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

विराट कोहलीला राजपाल यादवचा आवडतो 'हा' सिनेमा

वर्ष 2007 मध्ये प्रदर्शित झालेला 'ढोल' हा कॉमेडी सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमात राजपाल यादवसोबत शरमन जोशी, कुणाल खेमू आणि तुषार कपूर मुख्य भूमिकेत होते. 'पिंकविला'शी संवाद साधताना दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणाले, "मला 'ढोल' आणि 'खट्टा मिठा' हे दोन्ही सिनेमे खूप आवडले होते, पण ते थिएटरमध्ये फ्लॉप ठरले. पण ओटीटीमुळे आता लोक या सिनेमांचा आनंद घेत आहेत. जेव्हा मी 'ढोल' बनवला होता, तेव्हा मला वाटले होते की तो चांगली कामगिरी करेल. आता जेव्हा मी पाहतो की विराट कोहली आणि इतर खेळाडू म्हणतात की ते मॅचपूर्वी मनःशांतीसाठी 'ढोल' बघतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. ते तर आपापसात या सिनेमातील संवादही बोलतात."

(नक्की वाचा: Bhumi Pednekar Paithani Saree: कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ! भूमी पेडणेकरच्या पैठणी लुकने चाहत्यांना घातली भुरळ)

विराट कोहलीने सांगितली होती माहिती

यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान विराट कोहलीने राजपाल यादवच्या 'ढोल' सिनेमाचा उल्लेख केला होता आणि या सिनेमाबाबत आनंदही व्यक्त केला होता.

'ढोल'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन


विशेष म्हणजे जो सिनेमा आज टीव्ही आणि इंटरनेटवर लोक आवडीने पाहतात, पण प्रदर्शनावेळेस सिनेमा फ्लॉप ठरला होता. त्या काळात बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. पण 14 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने 33.27 कोटी रुपयांची कमाई केली होती, त्यामुळे कमाईच्या बाबतीत तो यशस्वी ठरला होता. काळानुसार या सिनेमाची लोकप्रियता वाढत गेली. विशेषतः राजपाल यादव यांचे मजेशीर सीन्स आणि त्यांचे एक्स्प्रेशन प्रेक्षकांना आजही खळखळून हसवतात.

(Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला आवडते कलाकार येणार तुमच्या भेटीला ठरणार, गिरगावच्या शोभायात्रेत कोणकोण होणार सहभागी? वाचा यादी)

विनोदी भूमिकेत निर्माण केली वेगळी ओळख

राजपाल यादव अशा कलाकारांपैकी एक आहेत ज्यांनी सहाय्यक भूमिकेतही आपली वेगळी छाप सोडली आहे. 'हंगामा', 'चुप चुप के', 'गरम मसाला' आणि 'भूल भुलैया' मधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात  आहेत. कदाचित याच कारणामुळे 'ढोल' सारखे चित्रपट आजही तितकेच हसवतात आणि विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूच्या ते आवडीचे सिनेमे आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com