'मी जिवंत आहे, प्लीज हे थांबवा...' मृत्यूच्या अफवांमुळे श्रेयस तळपदेचा संताप अनावर

Shreyas Talpade: मृत्यूच्या अफवांवर अभिनेता श्रेयस तळपदे संतापला आणि म्हणाला...

Advertisement
Read Time: 2 mins

Shreyas Talpade Death Hoax: अभिनेता श्रेयस तळपदेशी संबंधित संतापजनक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे श्रेयस तळपदेचा संताप अनावर झाला आहे. श्रेयसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तो जिवंत असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. कारण त्याच्या मृत्यूची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला. यानंतर श्रेयसने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. यासोबतच त्याने चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

श्रेयस तळपदने पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे? 

"मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. ज्या पोस्टमध्ये माझ्या मृत्यूचा दावा केला जात आहे, त्या पोस्टची मला माहिती मिळाली. मी समजू शकतो की विनोद मजामस्करीची आवश्यकता आहे, पण जेव्हा याचा गैरवापर केला जातो तेव्हा यामुळे खरेच नुकसान होऊ शकते. ज्याने कोणी हे विनोद म्हणून सुरू केले होते, त्यामुळे आता प्रत्येकजण तणावात आहे आणि ज्यांना माझी काळजी आहे, विशेषतः माझे कुटुंबीयांच्या भावनांशी हा खेळ आहे". 

(नक्की वाचा: Sai Tamhankar : सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'या' पोस्टमुळे चर्चेला उधाण)

Advertisement

(नक्की वाचा: Chhaava Teaser Out : शिवरायांचा छावा, विकी कौशल साकारणार स्वराज्यरक्षक संभाजीराजेंची भूमिका)

"....मन दुखावले जातेय"

श्रेयसने पुढे असेही लिहिलेय की,"माझी लहान मुलगी आहे, जी दररोज शाळेत जाते. ती माझ्या तब्येतीमुळे काळजीत असते आणि मी ठीक आहे ना, याबाबत ती सातत्याने प्रश्न विचारते. या खोट्या बातम्या तिला दुःख होत आहेत आणि तिला अधिक प्रश्न विचारण्यास भाग पाडताहेत. जे  लोक अशा प्रकारचा कॉन्टेंट पोस्ट करत आहेत, त्यांनी हे थांबवावे आणि यामुळे होणाऱ्या परिणामाबाबत विचार करावा. काही लोक खरंच माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात आणि अशा प्रकारे विनोदाचा वापर होत असल्याचे पाहून मन दुखावतेय". 

'ज्या व्यक्तीला टार्गेट केले जातेय, केवळ त्याच्यावर याचा प्रभाव होतो आणि त्याच्याशी संबंधित असलेले लोक जसे की कुटुंबीय आणि विशेषतः लहान मुले जे अशा प्रकारची परिस्थिती पूर्णपणे समजू शकत नाहीत. कृपया करून हे थांबवा. कोणासोबतही असे वागू नका. तुमच्यासोबत असे काही घडावे, अशीच मुळीच इच्छा नाही,कृपया संवेदनशील व्हा!"

श्रेयसला आला होता हृदयविकाराचा झटका

"वेलकम टू द जंगल" सिनेमाच्या शुटिंगदरम्यान श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. औषधोपचारांनंतर श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

Advertisement

(नक्की वाचा: ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य)

M Pox च्या केसमध्ये वाढ, भारतीयांसाठी चिंतेची बाब...WHO ने नेमकी काय माहिती दिली आहे?