जाहिरात

Chhaava Teaser Out : शिवरायांचा छावा, विकी कौशल साकारणार स्वराज्यरक्षक संभाजीराजेंची भूमिका

Chhaava Teaser Out: विक्की कौशलच्या 'छावा' सिनेमाचे टीझर पाहिले का?

Chhaava Teaser Out : शिवरायांचा छावा, विकी कौशल साकारणार स्वराज्यरक्षक संभाजीराजेंची भूमिका
Chhaava Teaser Out: विक्की कौशलच्या छावा सिनेमाचे टीझर रिलीज

Chhaava Teaser Out : बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'छावा' (Chhaava Movie) सिनेमाचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमामध्ये विकी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. टीझरमध्ये विकी हजारो शत्रूंशी एकट्याने लढा देताना दिसत आहे. ऐतिहासिक पेहरावातील त्याचा लुक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. टीझर पाहिल्यानंतर सिनेरसिक सिनेमा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. "शिवाजी महाराज को शेर कहते हैं...और हम शेर के बच्चे को छावा", अशा दमदार डायलॉगनेच टीझरची सुरुवात करण्यात आलीय. विकी कौशलचा छावा सिनेमा 6 डिसेंबरला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.  

विकी कौशलने सोशल मीडियावर सिनेमाचे टीझर शेअर केले आहेत. व्हिडीओवर चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

रश्मिका मंदानाचीही महत्त्वाची भूमिका

फर्स्ट लुकमध्ये युद्धाची अनेक दृश्य दिसत आहेत. विकीला एखाद्या शूरवीराप्रमाणे लढताना पाहून अंगावर शहारे येतात. त्याच्या लुक आणि अ‍ॅक्शनने सर्वांनाच प्रभावित केले आहे. विकी टीझर रिलीज करण्यापूर्वी विकीने सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर केले. छावा सिनेमामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखी आव्हानात्मक भूमिका निभावत आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या.   

Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? रिलीजबाबत हाती आली मोठी अपडेट

(नक्की वाचा: Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? रिलीजबाबत हाती आली मोठी अपडेट)

विकीव्यतिरिक्त सिनेमामध्ये रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्नाचीही महत्त्वाची भूमिका आहे. रश्मिका छत्रपती संभाजीराजेंची पत्नी येसुबाई भोसले यांच्या भूमिकेत तर अक्षय खन्ना औरंगजेबची भूमिका निभावत आहे. छावा सिनेमा 6 डिसेंबर 2024 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

लक्ष्मण उटेकर यांनी छावा सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. छावा हे एक ऐतिहासिक नाटक आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे. 

ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य

(नक्की वाचा: ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य)

Ujjain | श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची मांदियाळी, शिवशंकराला 56 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com