जाहिरात

ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य

Abhishek Bachchan Aishwarya Rai: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाबाबत गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चा रंगली आहे. यावर अखेर अभिषेक बच्चन प्रतिक्रिया देत सर्वांसमोर सत्य आणले आहे.

ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य

Abhishek Bachchan Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने नुकतेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपस्थिती दर्शवली होती. दुसरीकडे अनेक दिवसांपासून तो त्याच्या वैवाहिक जीवनामुळेही चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आता खुद्द अभिषेकनेच या चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चनने बॉलीवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या लग्नाची अंगठी दाखवत सांगितले की आम्ही अजूनही एकमेकांसोबत (Still Married)आहोत.

(नक्की वाचा: 'मी आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेत आहोत'? अभिषेक बच्चनच्या Viral Video चं सत्य काय?)

'तुम्ही असे का केले असावे...'

पुढे त्याने असेही म्हटले की, "मला याबाबत काहीही म्हणायचे नाही. खेदाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी ही संपूर्ण गोष्ट अतिशय विचित्र पद्धतीने मांडली. तुम्ही असे का केले असावे, हे मी समजू शकतो. तुम्हाला काही स्टोरीज् द्याव्या लागतात. हरकत नाही, आम्ही सेलिब्रिटी आहोत, आम्हाला हे स्वीकारावे लागेल."

(नक्की वाचा: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला अभिषेक बच्चन, व्हायरल फोटो पाहून फॅन्सनी विचारला प्रश्न)

घटस्फोटाच्या अफवा

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामध्ये काहीही ठीक नसून दोघंही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत. एका हायप्रोफाइल लग्नसोहळ्यामध्ये हे जोडपे एकत्रित सहभागी न झाल्याने घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर अभिषेकने ग्रे घटस्फोटाच्या वाढत्या प्रकरणांसंदर्भातील एक इंस्टाग्राम पोस्टही लाइक केली, ज्यामुळे बच्चन कपलच्या घटस्फोटाचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. याशिवाय अभिषेक बच्चनचा एक डीपफेक व्हिडीओही व्हायरल झाला, ज्यामध्ये तो घटस्फोटाची माहिती देत असल्याचे दिसले. दरम्यान हा व्हिडीओ फेक होता.

थाटामाटामध्ये झाले होते लग्न

वर्ष 2007मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचे थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. यानंतर 2011मध्ये या जोडप्याने त्यांची लाडकी लेक आराध्याला जन्म दिला होता. 

( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
'मी आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेत आहोत'? अभिषेक बच्चनच्या Viral Video चं सत्य काय?
ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य
is hardik pandya cheated on his wife internet users reactions natasa stankovic social media liked post
Next Article
हार्दिक पांड्याने केली नताशाची फसवणूक? या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण