Viral Video: गोविंदा-शाहरुख खानने कधीही एकत्र काम केलं नाही, पण हीरो नंबर 1ने बादशाहबद्दल काय म्हटलं; ऐकाच...

Shah Rukh Khan: गोविंदाने शाहरुख खानबाबत भर कार्यक्रमात केले मोठं विधान, पाहिला का हा व्हिडीओ?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Shah Rukh Khan: गोविंदाने शाहरुख खानबाबत काय म्हटलं ऐका?"
Shah Rukh Khan Instagram And IANS

Shah Rukh Khan: कपिल शर्माच्या धमाल कॉमेडी शो सेटवरील अभिनेता गोविंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. गोविंदाने शाहरुख खानचं अशा शब्दांत कौतुक केलंय की हा व्हिडीओ तुम्ही वारंवार पाहाल. कपिल शर्मासोबत बातचित करताना हीरो नंबर 1ने म्हटलं की, शाहरुख सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीतील सर्वात हुशार आणि बुद्धिमान अभिनेता आहे. शाहरुखचा सर्वात चांगला गुण म्हणजे त्यानं आधी स्वतःवर प्रेम केलं. खूप शिकलेला आहे, हुशार आहे आणि समजुतदारपणे निर्णय घेण्याच्या सवयीमुळे त्याला फार लहान वयात सर्व गोष्टी समजल्या.

एकाही सिनेमामध्ये काम केलं नाही

गोविंदा आणि शाहरुख खान दोघांनी आपापल्या काळात बॉलिवूडला सुपरहिट सिनेमे दिले, पण दोघांनी कधीही एकत्र काम केलेले नाही. दोघांनीही स्वतःच्या हुशारीच्या जोरावर, कठोर परिश्रम करून इंडस्ट्रीमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केलीय.

(नक्की वाचा: Rinku Rajguru Asha Movie: त्या निळ्या साडीवाल्या बाईनं... रिंकू राजगुरूच्या आशा सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर)

सोशल मीडियावर चाहत्यांची प्रतिक्रिया

गोविंदाने शाहरुख खानसाठी व्यक्त केलेल्या भावनांवर कित्येक चाहत्यांनीही कमेंट करत प्रतिक्रिया दिलीय. एकाने म्हटलंय की, "गोल्डन लाइन-सर्वात आधी स्वतःवर प्रेम केले". आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, "दोघंही स्वतःच्या हिंमतीवर तयार झालेले उत्कृष्ट अभिनेते आहेत.

Advertisement

(नक्की वाचा: Gautami Patil New Video: काळी बिंदी आणि गुलाबी साडी... गौतमी पाटीलचा Ruperi Valut गाण्यात रोमँटिक अवतार)

गोविंदाचे खासगी आयुष्य आणि वाद

Topics mentioned in this article