जाहिरात

Gautami Patil New Video: काळी बिंदी आणि गुलाबी साडी... गौतमी पाटीलचा Ruperi Valut गाण्यात रोमँटिक अवतार

Gautami Patil New Video: प्रसिद्धी नृत्यांगना गौतमी पाटीलचा रोमँटिक अंदाजातील व्हिडीओ पाहिला का?

Gautami Patil New Video: काळी बिंदी आणि गुलाबी साडी... गौतमी पाटीलचा Ruperi Valut गाण्यात रोमँटिक अवतार
Gautami Patil Ruperi Valut Song: गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ पाहिला का?
Abhijeet Sawant Instagram

Gautami Patil New Video: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा आतापर्यंत तुम्ही लावणीचा ठसका पाहिलाय. सबसे कातील गौतमी पाटीलने तिच्या लावणीने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलंय. पण गौतमी आता तिच्या रूपाने चाहत्यांना घायाळ करणार आहे. नुकतेच गौतमी पाटीलचे 'रुपेरी वाळूत' हे रीमिक्स गाणं रिलीज झालंय. प्रसिद्ध गायक अभिजीत सावंतही (Abhijeet Sawant News) या गाण्यात झळकलाय. जुने मराठी गाणे 'रुपेरी वाळूत' नव्या धाटणीत प्रेक्षकांसमोर आणण्यात आलंय. या गाण्याच्या निमित्ताने अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.

अभिजीत सावंत आणि विश्वजा जाधव यांच्या सुरेल आवाजाने या गाण्याची रंगत अधिक वाढवलीय. विजय भाटेने या गाण्याला संगीत दिलंय, तर करण सावंत गाण्याचा गीतकार आहेत.

(नक्की वाचा : Rinku Rajguru Asha Movie: त्या निळ्या साडीवाल्या बाईनं... रिंकू राजगुरूच्या आशा सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर)

अभिजीत आणि गौतमीचा रोमँटिक लुक | Gautami Patil And Abhijeet Sawant

रुपेरी वाळूत या रीमिक्स गाण्यामध्ये अभिजीत सावंत (Abhijeet Sawant Ruperi Valut Song) आणि गौतमी पाटीलचा (Gautami Patil Ruperi Valut Song) रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. दोघांचाही रेट्रो लुक प्रेक्षकांना आवडतोय. 

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंतचा रोमँटिक लुक Gautami Patil And Abhijeet Sawant Romantic Song

व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांना शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 

गौतमी पाटीलने शेअर केले खास फोटो

(नक्की वाचा: Shala Marathi Song Video: शाळा मराठी गाणं रिलीज, छत्रपती संभाजीनगरच्या 12 वर्षांच्या लेकराच्या आवाजाने केली जादू)

रुपेरी वाळूत मूळ गाण्याच्या गायिका कोण?

रुपेरी वाळूत हे मूळ आणि सदाबहार गाणं प्रसिद्धी गायिका आशा भोसले यांनी गायलंय. या गाण्याला अनिल-अरुण यांनी संगीत दिलं होतं तर शांतराम नांदगाव यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत

रुपेरी वाळूत गाण्यावरील व्हायरल झालेले व्हिडीओ

कोरिओग्राफर वैभव घुगेचा कमाल व्हिडीओ 
Listen to the latest songs, only on JioSaavn.com