Madhur Dixit In Politics: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा वर्षभरापासून ऐकायला मिळतेय. लोकसभा 2024च्या निवडणुकीदरम्यानही माधुरी पुणे किंवा अन्य कोणत्यातरी जागेवरून निवडणूक लढवू शकते, अशी चर्चा सुरू होती. पण प्रत्यक्षात असं काहीही घडलं नव्हतं. यानंतरही प्रत्येक मुलाखतीदरम्यान माधुरी दीक्षितला राजकारणाबाबत प्रश्न विचारण्यात येत होते. नुकतेच ANI वृत्तसंस्थेशी बातचित करताना माधुरी दीक्षितने राजकारण प्रवेशाबाबत स्पष्ट विधान केलंय.
राजकारण प्रवेशाबाबत माधुरी दीक्षितने काय सांगितलं?
माधुरी दीक्षितने सांगितलं की, "मी राजकारणासाठी बनलेय, असे मला वाटत नाही. मी एक कलाकार आहे. कलाकार म्हणून मी जागरुकता निर्माण करू शकते, लोकांना मदत करू शकते आणि माझे विचार शेअर करू शकते; याच रुपात मी स्वतःला पाहते".
माधुरीने पुढे असंही म्हटलं की, "राजकारणामध्ये प्रवेश करणं अशी माझी महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. मी स्वतःला तेथे पाहत नाही."
(नक्की वाचा: Samantha Ruth Prabhu Marriage Photos: समांथा रुथ प्रभूचा फॅमिली मॅन! राज निदिमोरुसोबत या मंदिरात केलं लग्न)
"तेजाब", "हम आपके हैं कौन", "दिल तो पागल है" आणि "देवदास" यासारखे सुपरहिट सिनेमे माधुरीने इंडस्ट्रीला दिले आहेत. राजकीय व्यासपीठाच्या तुलनेत एक कलाकार म्हणून जास्त प्रभाव पाडू शकते, असे माधुरीचे म्हणणंय.
(नक्की वाचा: Samantha Ruth Prabhu Raj Nidimoru: समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरूचे नेटवर्थ किती, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?)
माधुरी दीक्षितचे आगामी प्रोजेक्ट
कामाबाबत सांगायचे झाले तर माधुरी दीक्षित लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाकेदार एण्ट्री करणार आहे. तिची नवी वेबसीरिज 'मिसेस देशपांडे' 19 डिसेंबर 2025 रोजी जियो हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. नागेश कुकुनूरने या थ्रीलर-ड्रामा सीरिजचे दिग्दर्शन केलंय. फ्रेंच भाषिक सीरिज ‘ला मांते'पासून प्रेरित असलेल्या सीरिजमध्ये माधुरी वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियांशु चटर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

