Salman Khan: 'माझ्या नुकसानीतून कमवायचे असेल तर...' हॉस्पिटलबाहेर नेमके काय घडलं? सलमान खानने दिला कडक इशारा

Salman Khan News: सलमान खानने सोशल मीडियावरून पापाराझी आणि प्रेसला दिली कडक इशारा. हॉस्पिटलबाहेर नक्की काय घडलं ज्यामुळे 60 वर्षांच्या भाईजानने आपला संयम गमावला आणि लागोपाठ 4 पोस्ट करत संताप व्यक्त केला? वाचा सविस्तर वृत्त.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Salman Khan News: सलमान खानने पापाराझींना दिला इशारा"
Salman Khan Instagram

Salman Khan Post: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर फारसा  ॲक्टिव्ह असतो. पण गेल्या काही दिवसांपासून तो आपला राग, दुःखासह वेगवेगळ्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना व्यक्त करताना दिसत आहे. नुकतंच त्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पापाराझींना (फोटोग्राफर्सना) चांगलंच झापून इशारा दिलाय. सलमान खान पापाराझींवर का ओरडला? तुम्हीही याचाच विचार करत असाल. तर नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये सुपरस्टार सलमान खान हॉस्पिटलबाहेर पापाराझींना झापताना दिसतोय. सलमान खान हॉस्पिटलमधून बाहेर पडत होता त्यावेळेस पापाराझी त्याला मोठमोठ्याने हाक मारत होते, यावर सलमान खान भडकला. दरम्यान या घटनेनंतर त्याने सलग चार पोस्ट शेअर केल्या आहेत. 

सलमान खानने दिला इशारा  

इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सेल्फी शेअर करत सलमान खानने लिहिलं, "जर मला हॉस्पिटलमध्ये असा कोणी प्रेसवाला दिसला, जो माझ्या दुःखाची मजा घेत असेल... तीच प्रेस, ज्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहिलो, ज्यांच्याशी मी संवाद साधला, ज्यांची मी काळजी घेतली आणि त्यांनाही त्यांची रोजीरोटी कमावता यावी याकडे लक्ष दिलं."

Advertisement

(नक्की वाचा : त्याच्यामध्ये मत्सर आणि अहंकार..फेम गुरुकुलमध्ये अरिजित सिंगला हरवणाऱ्या काझी तौकीरचं 21 वर्षांनंतर मोठं विधान)

सलमान खान म्हणाला- गप्प बसा

दुसऱ्या एका पोस्टमध्ये सलमानने लिहिलंय की, "जर त्यांना माझ्या नुकसानीतून पैसे कमवायचे असतील, तर गप्प बसा. एन्जॉय करू नका. फोटो महत्त्वाचा आहे की आयुष्य?"

तुमचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर...: सलमान खान 

तिसऱ्या पोस्टमध्ये सलमान खानने लिहिलं, "असे मी शंभर जाळून टाकीन. भावाच्या दुःखावर पुढच्या वेळेस माझ्यासोबत ट्राय करून बघा. फक्त ट्राय करून बघा. जेव्हा तुमचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल, तेव्हा मी असं वागेन का?"

सलमान खानने चौथ्या पोस्टमध्ये म्हटलं- लढणं विसरलेलो नाही

आणखी एका पोस्टमध्ये सलमान खानने म्हटलं, "60 वर्षांचा झालो आहे. पण लढणं विसरलेलो नाही, हे लक्षात ठेवा. जेलमध्ये टाकाल हा हा."