Bollywood News: बॉलिवूडमध्ये असे कित्येक कलाकार आहेत, ज्यांनी एकेकाळी इंडस्ट्रीवर राज्य केले आणि नंतर रातोरात ही मंडळी अचानक गायब झाली. ग्लॅमरस जगातून गायब झाल्यानंतर या मंडळींना पोट भरण्यासाठी मोठा संघर्षही करावा लागला, वृद्धापकाळात वैद्यकीय उपचारांसह आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा कित्येक दिग्गज कलाकारांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. दुसरीकडे काही स्टार्स असेही होते जे दशकानुदशके बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेपासून दूर होते पण अगदी वैभवशाली आयुष्य जगत आहेत.
दिग्गज कलाकाराचा स्वतःचा व्यवसाय
जवळपास दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडपासून दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक संजय खान हे देखील त्यापैकी एक कलाकार आहेत, ज्यांच्याकडे पैशांची मुळीच कमतरता नाही. इतके वर्षे रुपेरी पडद्यापासून आणि दिग्दर्शनापासून दूर असतानाही स्वतःच्या व्यवसायाच्या जोरावर ते वैभवशाली जीवन जगत आहेत.
तांदूळ निर्यातीचा बिझनेस
संजय खान (Sanjay Khan) यांचा जन्म बंगळुरू शहरातील एका मुस्लीम कुटुंबामध्ये झाला. वडिलांप्रमाणेच संजय खान देखील सुरुवातीच्या काळात व्यवसायामध्ये सहभागी झाले होते. रिपोर्ट्सनुसार, 80च्या दशकात मध्य पूर्वेकडील देशांमध्ये त्यांनी तांदूळ निर्यात करण्याचा व्यवसाय सुरू केला.
10 हजार कोटी रुपयांच्या बिझनेसची घोषणा?
1997 मध्ये संजय खान यांनी बंगळुरूमध्ये त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट फाइव्ह स्टार डिलक्स गोल्डन पाम्स हॉटेल अँड स्पा सुरू केले. त्यांची पत्नी जरीन खान यांनी हॉटेलच्या आतील भागाचे डिझाइन तयार केले होते. 2010पर्यंत अभिनेत्याकडे सुमारे 150 खोल्यांचे गोल्डन पाम्स हॉटेल अँड स्पाचे मालकी हक्क होते. ते रिअल इस्टेट क्षेत्रामध्येही सक्रिय आहेत. 2018 मध्ये त्यांनी 10 हजार कोटी रुपयांच्या बजेटचे थीम पार्क उभारण्याची घोषणा केली, पण काही वादांमुळे तो प्रकल्प बंद पडला.
(नक्की वाचा: Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! सोहम बांदेकरचा केळवण सोहळा, दादरच्या आस्वाद हॉटेलमध्ये असा आखला सात्विक बेत)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
