Vikrant Massey Look From White: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी मोठ्या पडद्यावर आणखी एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. '12वीं फेल', 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'सेक्शन 36' यासारख्या सिनेमांनंतर विक्रांत आता आध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पठाण आणि वॉर यासारखे शानदार सिनेमे इंडस्ट्रीला देणारा सिद्धार्थ आनंद या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. श्री श्री रवि शंकर यांच्या बायोपिकचे नाव 'व्हाइट' असे आहे.
सिनेमाचे शुटिंग कधीपासून होणार सुरू?
विक्रांत मेसीने सोशल मीडियावर श्री श्री रवि शंकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. ऑगस्ट 2025 पासून सिनेमाचे शुटिंग सुरू होणार असल्याची माहिती विक्रांतने दिलीय. हा सिनेमा 2026मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(नक्की वाचा: Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम)
विक्रांतचा बदललेला लुक
व्हाइट सिनेमामधील विक्रांत मेसीचा फर्स्ट लुक देखील समोर आला आहे. सिनेमासाठी विक्रांतने मिशी आणि केस वाढवले आहेत. त्याने श्री श्री रविशंकर यांचीही भेट घेतली. विक्रांत श्री श्री रविशंकर यांची देहबोली शिकत असल्याचे या फोटोच्या माध्यमातून दिसत आहे. हा सिनेमा हिंदी, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
(नक्की वाचा: विशाल निकमच्या खऱ्या आयुष्यातील मिस फायर आहे ही अभिनेत्री? त्या कमेंटची होतेय चर्चा)