Dharemndra House Income Tax Raid News: आशा पारेख (Asha Parekh) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांची जोडी 1960च्या दशकात प्रचंड लोकप्रिय झाली होती. पण या जोडीशी संबंधित कधीही न ऐकलेल्या एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर NDTVशी बातचित करताना आशा पारेख यांनी सांगितलं की, समाधी सिनेमाच्या शुटिंगदरम्यान धर्मेंद्रसह त्यांच्या घरी देखील आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्याच दिवशी दोघांचा सिनेमातील एका अतिशय भावुक सीनचे चित्रिकरण करण्यात येणार होते.
समाधी सिनेमातील भावुक सीन आणि दुसरीकडे तणाव
आयकर विभागाच्या छापेमारीच्या दिवशी समाधी सिनेमातील आशा पारेख यांचा मृत्यू झाल्याच्या सीनचं चित्रिकरण करायचं होतं. मानसिक ताण इतका होता की आशा पारेख मेलेल्या वाटतच नव्हत्या, त्यांच्या पापण्यांची हालचाल होत होती. हा जुना किस्सा आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
1960च्या दशकात आशा पारेख आणि धर्मेंद्र यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय होती. ‘आए दिन बहार के' (1966), ‘शिकार' (1968), ‘आया सावन झूम के' (1969), ‘मेरा गांव मेरा देश' (1971) आणि ‘समाधि' (1972) यासारखे सुपरहिट सिनेमे या जोडीने इंडस्ट्रीला दिले.
धर्मेंद्र-आशा पारेख यांच्या घरी आयकर विभागाचा छापा
NDTVशी बातचित करताना आशा पारेख म्हणाल्या की, ‘समाधी' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान एक दिवस असा आला की त्यांच्यासह धर्मेंद्र यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली. त्याच दिवशी समाधी सिनेमातील गाजलेला सीन शुट करायचा होता. ज्यामध्ये आशा पारेख यांचा मृत्यू होतो आणि धर्मेंद्र त्यांच्या मृतदेहाजवळ बसून रडत असतात.
याबाबत आशा पारेख म्हणाल्या की, "माझ्या पापण्यांची वारंवार हालचाल होत होती. मी मेलेले वाटतच नव्हते. धरमजी देखील खूप तणावात होते. आम्ही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन सेटवर शुटिंगसाठी आलो होतो.
(नक्की वाचा: Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस! फार्महाऊसवर होणार सेलिब्रेशन, सनी-बॉबीचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय?)
तणावामध्ये सिनेमातील सीनचे झालं होतं चित्रीकरण
बाहेरुन हे क्षण कदाचित हलकेफुलके वाटत असतील पण त्या दिवशीची स्थिती तणावपूर्ण होती. आमच्या दोघांचंही सेटवरील शुटिंगमध्ये लक्ष केंद्रित होत नव्हते कारण घरामध्ये आयकर विभागाचे अधिकारी तैनात होते. ‘समाधी' सिनेमामध्ये धर्मेंद्र यांनी लखन सिंह नावाच्या दरोडेखोराची भूमिका साकारली होती, जो पत्नी चंपाच्या (आशा पारेख) औषधोपचारांसाठी पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्वामध्ये परततो.
(नक्की वाचा: Dharmendra News: एकमेव कॉमेडियन ज्याला हीरो घाबरायचे, पण धर्मेंद्र यांच्यासमोर ते देखील जोडायचे हात)
इतक्या सिनेमांमध्ये एकत्रित काम केल्यानंतर आशा पारेख आणि धर्मेंद्र यांच्यामध्ये मैत्रीचं चांगलं नातं निर्माण झालं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

