जाहिरात

समय रैनाच्या 'India’s Got Latent' शोमधील स्पर्धकाविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

India’s Got Latent' Show : अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील रहिवासी अरमान राम वेली बखा यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

समय रैनाच्या 'India’s Got Latent' शोमधील स्पर्धकाविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन समय रैना अडचणीत येण्याची शक्यता आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे शो मधील एका स्पर्धकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अरुणाचल प्रदेशातून आलेल्या एका स्पर्धकाने 'डॉग मीट'बाबत केलेल्या टिप्पणीवरून वाद निर्माण झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अरुणाचल प्रदेशातील एका व्यक्तीने या प्रकरणात पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीच्या आधारे स्पर्धकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचा दावा अनेक मीडिया प्लॅटफॉर्म करत आहेत. पोलिसांनी मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

(नक्की वाचा-  Praneet More : वीर पहारियाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण)

इंडियाज गॉट लेटेंट हा यूट्यूबवरील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झालेला शो आहे. समय रैनाच्या या शोच्या एका भागात, अरुणाचल प्रदेशची रहिवासी जेसी नबाम स्पर्धक म्हणून आली होती. शो दरम्यान, जज आणि शोचा होस्ट समय यांने विचारले की, "तुम्ही कधी कुत्र्याचे मांस खाल्ले आहे का?" यावर जेसी म्हणाली "अरुणाचलचे लोक कुत्र्याचे मांस खातात पण मी ते कधीही खाल्ले नाही. मला माहित आहे कारण माझे मित्र ते खातात. कधीकधी ते त्यांच्या पाळीव प्राण्यांनाही खातात.”

(नक्की वाचा -  Udit Narayan उदित नारायणनं भर कार्यक्रमात महिला फॅन्ससोबत केले अश्लील वर्तन, फॅन्स संतापले Video)

अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील रहिवासी अरमान राम वेली बखा यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेसी यांनी इंडियाज गॉट लेटेंटमध्ये अरुणाचल प्रदेशातील लोकांविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी केली आहे. या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी जेणेकरून भविष्यात कोणीही जेसीसारखे वागू नये. 

याआधीही समय रैनाच्या या शोमध्ये अनेक वादग्रस्त गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. बरेच स्पर्धक असे काही करतात किंवा बोलतात ज्यामुळे लोकांना त्रास होतो. हा शो YouTube वर लाखो लोक पाहत आहेत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: