
chal halla bol : 'गोलपीठा' या कविता संग्रहातून दलित समाजातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणणारे... दलित, गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पँथरसारख्या चळवळीतून विद्रोहाची तलवार उपसणारे पद्मश्री, विद्रोही कवी नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांचा जीवनावर आधारित 'चल हल्ला बोल' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील सर्व कविता काढून मगच प्रदर्शित कराव्यात अशी अट निर्मात्यांसमोर ठेवली. इतकच नाही तर त्यांनी थेट 'कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही' असा सवाल नोटीसमध्ये विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'चल हल्ला बोल' या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी एका वृत्त माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली. सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हश्मी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना याबाबत नोटीस पाठवली होती. त्यात नामदेव ढसाळ कोण आहे, आम्हाला माहीत नाही. त्यांच्या कविता काढला तरच चित्रपटाला परवानगी मिळेल असा फतवा काढल्याने दलित समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. UA साठी रिजेक्ट करण्यात आला असून A श्रेणीसाठी सेन्सॉर बोर्डाने अनेक सूचना केल्या आहेत.
नक्की वाचा - Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं नृत्य नको, त्र्यंबकेश्वर संस्थानच्या कार्यक्रमावर आक्षेप; काय आहे प्रकरण?
सेन्सॉर बोर्डाने नोटीसीत काय म्हटलंय?
- वाघ्या-मुरळीचा डान्सला ज्याला आपण लोकनृत्य म्हणतो त्याला काय म्हणतात हे सेन्सॉर बोर्डाला माहीत नव्हतं. नोटीसीत स्टेज डान्स लिहिलं आहे.
- मंदिराचे सीन्स काढायला सांगितलं.
- हरामखोर शब्द काढून टाकण्याची सूचना
- नामदेव ढसाळ्यांच्या कवितेतील शिव्या काढण्याची सूचना
- कोण नामदेव ढसाळ, आम्हाला माहीत नाही असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world