जाहिरात

Actress Soundarya : अभिनेत्री सौदर्याचा मृत्यू घात की अपघात? 21 वर्षांनंतर मोठा ट्विस्ट

Sowmya Sathyanarayana Death : अभिनेता मोहन बाबू याच्याविरुद्ध चित्तमुल्ला नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर मोहन बाबूने तिच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला.

Actress Soundarya : अभिनेत्री सौदर्याचा मृत्यू घात की अपघात? 21 वर्षांनंतर मोठा ट्विस्ट
Soundarya in an old picture

'सूर्यवंशम' फेम अभिनेत्री सौंदर्याच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी नवीन ट्विस्ट घेतला आहे. सौदर्यांचा मृत्यू घात होता की अपघात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध आंध्रप्रदेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की अभिनेत्री सौंदर्याचा मृत्यू अपघात नव्हता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सौंदर्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौम्या सत्यनारायणचा 17 एप्रिल 2004 रोजी विमान अपघातात मृत्य झाला होता. विमान बेंगळुरूजवळील कृषी विज्ञान विद्यापीठाच्या गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या कॅम्पसमध्ये कोसळले. मात्र सौंदर्याच्या मृत्यूच्या 21 वर्षांनंतर मृत्यू अपघात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्ह्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार चिट्टीमल्लू यांनी आरोप केला आहे की सौंदर्याचा मृत्यू अपघाती नव्हता. तर तेलुगू अभिनेता मोहन बाबूसोबतच्या मालमत्तेच्या वादाशी संबंधित खून होता.

(नक्की वाचा- कार्तिक आर्यन या साऊथ अभिनेत्रीला करतोय डेट? आईच्या वक्तव्याने चर्चांवर शिक्कामोर्तब?)

तक्रारदाराने असा दावा केला आहे की, अभिनेत्रीने मोहन बाबूला 6 एकर जमीन विकण्यास नकार दिला होता. मोहन बाबू ही गोष्ट सहन करू शकला नाही. त्यानंतर काही दिवसातच अभिनेत्री आणि तिचा भाऊ यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अनेक अहवालांनुसार, भारतीय जनता पक्ष आणि तेलगू देसम पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी करीमनगरला जात असताना त्यांचे विमान क्रॅश झाले होते. अहवालात असेही म्हटले आहे की अभिनेत्री सौदर्याचा मृत्यू झाला तेव्हा ती गर्भवती होती.

(नक्की वाचा- Dhanashree Varma Post : युजवेंद्र चहल-RJ महवशचे फोटो व्हायरल, धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत, म्हणाली...)

जमिनीचा बेकायदेशीर कब्जा

अभिनेता मोहन बाबू याच्याविरुद्ध चित्तमुल्ला नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर मोहन बाबूने तिच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला. तक्रारदाराने असेही म्हटले आहे की अभिनेता मोहन बाबूमुळे त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याने संरक्षणाची मागणी केली आहे. 

नक्की वाचा - Chal halla Bol: सेन्सॉर बोर्डाचा उर्मटपणा! नामदेव ढसाळांच्या कुटुंबियांचा अपमान; तुम्ही दलित...

तेलुगू इंडस्ट्रीमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारणाऱ्या मोहन बाबूने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आपल्यावर झालेल्या आरोपांना मोहन बाबू उत्तर देणार की नाही हे आता पाहावं लागणार आहे. मात्र सौदर्याचा मृ्त्यू अपघात होता की काही घात झाला होता, हे तपासातून स्पष्ट होईल. 

अवघ्या 32 व्या वर्षी निधन

सौंदर्याचे निधन झाले तेव्हा ती अवघी 32 वर्षांची होती. सौंदर्याने प्रामुख्याने कन्नड, तमिळ, मल्याळम तेलुगू व्यतिरिक्त हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होले. 1999 मध्ये आलेल्या 'सूर्यवंशम' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी 2003 मध्ये तिने सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्ह श्रीधरशी लग्न केले होते

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: