![Gautami Patil : गौतमीने साजरा केला 'खास' लोकांसोबत वाढदिवस, कोण आहेत ही मंडळी? Gautami Patil : गौतमीने साजरा केला 'खास' लोकांसोबत वाढदिवस, कोण आहेत ही मंडळी?](https://c.ndtvimg.com/2025-02/tln7ii68_gautami-patil-_625x300_09_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
गौतमी पाटील तिचा डान्स आणि अदांसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की चाहत्यांची हजारोंची गर्दी फिक्स. गौतमी एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी चढाओढ सुरु असते. तिचे कार्यक्रम आणि वाद नेहमीच चर्चेत असतात. मात्र सध्या गौतमी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आहे. सतत गर्दीच्या गराड्यात असणाऱ्या गौतमीने तिचा वाढदिवस एकांतात साजरा केलाय. विशेष मुलांसोबत तिने आपला वाढदिवस साजरा केला.
गौतमी पाटीलचा फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असतो. यंदा तिने तिचा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला. यासाठी तिने अनिकेत सेवाभावी संस्थेची निवड केली. 6 फेब्रुवारी रोजी अनिकेत सेवाभावी संस्थेत जाऊन तिने तेथील मुलांसोबत मज्जा-मस्ती करत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केले.
मुलांसोबत विविध गाण्यांवर तिने नाच देखील केला. 'पाटलांचा बैलगाडा' तिच्या गाण्यावर मुलांनी डान्स करत आनंद लुटला. गौतमीच्या चेहऱ्यावर मुलांसोबत वेळ घालवताना आनंद स्पष्ट दिसत होता. तिचं खळखळून हसणं मुलांना प्रोत्साहित करत होतं.
मुलांसाठी गौतमीचं रिटर्न गिफ्ट
गौतमीचं संस्थेतील कर्मचाऱ्यांनी औक्षण करुन स्वागत केलं. गौतमीने मुलांसोबत केक देखील कापला. मुलांनी देखील स्वत: बनवलेले काही गिफ्ट गौतमीला दिले. गौतमीने देखील रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना काही भेटवस्तू, संस्थेला किराणा आणि फ्रिज गिफ्ट म्हणून दिला.
गौतमीच्या कार्यकमांच्या सुपाऱ्यांबद्दल नेहमीच बोललं जातं. एकेका कार्यक्रमांना गौतमी लाखो रुपये आकारते, यातून तिच्या श्रीमंतीची नेहमीच चर्चा होते. मात्र तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे तिच्या मनाच्या श्रीमंतीचा अंदाज देखील तिच्या चाहत्यांना आला. गौतमीने या छोट्याशा कृतीतून अवघ्या महाराष्ट्राचं मन जिकलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world