जाहिरात

अभिनेता दर्शनची काय झाली अवस्था; जेलमधून बाहेर येताच थेट रुग्णालयात पोहोचला

दर्शन चाहत्याच्या हत्याप्रकरणी आरोपी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याला 30 ऑक्टोबर रोजी सहा आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामिनाचा कालावधी संपल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.

अभिनेता दर्शनची काय झाली अवस्था; जेलमधून बाहेर येताच थेट रुग्णालयात पोहोचला

कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपची अलीकडेच बेल्लारी मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. फॅनच्या हत्या प्रकरणात दर्शन कारागृहात शिक्षा भोगत होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. तुरुंगातून बाहेर येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाठ आणि पायांच्या तीव्र वेदनांचा सामना अभिनेत्याला करावा लागत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभिनेता दर्शन हा त्याच्या तंदुरुस्त शरीरासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जात होता. मात्र तुरुंगात गेल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात त्याचे वजन सुमारे 10 किलोने कमी झाले आहे. त्यामुळे त्याची प्रकृती झपाट्याने खालावली आहे. याच कारणास्तव अभिनेत्याला कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

(नक्की वाचा -  दारुड्या नवऱ्याची रोजची कटकट; संतापलेल्या बायकोने कापलं गुप्तांग)

दर्शनाचे तब्येतीबाबत विविध अंदाज लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन तुरुंगात असताना तो त्याचा सामान्य आहार आणि वर्कआउट करु शकला नाही. ज्यामुळे त्याचे स्नायू कमकुवत झाले आणि पाठदुखीची समस्या वाढली. तुरुंगात राहिल्याने त्याची प्रकृती खालावल्याचेही त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले.

(नक्की वाचा- पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पत्नीकडून साफ करुन घेतला बेड; मध्य प्रदेशातील संतापजनक प्रकार)

डॉक्टरांनी काय सांगितले?

हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं, अभिनेत्याच्या डाव्या पायात खूप अशक्तपणा आला आहे. तसेच वजन कमी झाल्यानंतर पाठदुखीचा त्रास वाढला आहे. दर्शनला उद्वभवलेल्या त्रासांच्या लक्षणांचा अभ्यास केला जात आहे. एमआरआय, एक्स-रे आणि रक्त चाचण्या केल्या जात आहेत. सर्व रिपोर्ट्स आल्यानंतर अभिनेत्याला शस्त्रक्रियेची गरज आहे की उपचारानेच आराम मिळेल हे स्पष्ट होईल.  

दर्शन चाहत्याच्या हत्याप्रकरणी आरोपी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याला 30 ऑक्टोबर रोजी सहा आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामिनाचा कालावधी संपल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com