जाहिरात

​​​​​​​'मिनी तिरुपती' मंदिरात चेंगराचेंगरी! एकादशीला 25000 भाविकांची गर्दी उसळली, 10 जणांचा जीव गेला, तर..

Stampede At Mini Tirupati Sri Venkateswara Swamy Temple : आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलमच्या व्येंकटेश्वर मंदिरात आज चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या मंदिराचं बांधकाम सुरु होतं. मंदिराची एकच एग्झिट आणि एंन्ट्री होती. यामुळेच मंदिरात गर्दी उसळली.

​​​​​​​'मिनी तिरुपती' मंदिरात चेंगराचेंगरी! एकादशीला 25000 भाविकांची गर्दी उसळली, 10 जणांचा जीव गेला, तर..
Stampede At Sri Venkateswara Swamy Temple
मुंबई:

Stampede At Mini Tirupati Sri Venkateswara Swamy Temple : आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलमच्या व्येंकटेश्वर मंदिरात आज चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या मंदिराचं बांधकाम सुरु होतं. मंदिराची एकच एग्झिट आणि एंन्ट्री होती. यामुळेच मंदिरात गर्दी उसळली आणि या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. राज्य सरकारच्या सूत्रांनी म्हटलंय की, हरिमुकुंद पांडा नावाच्या 80 वर्षांच्या एका व्यक्तीनं हे मंदिर बांधलं होतं. त्यांनी त्यांच्या जागेवर भगवान व्येंकटेश्वरच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा केली. हे मंदिर भाविकांसाठी 4 महिन्यांपूर्वीच उघडलं होतं. या मंदिराला मिनी तिरुपतीच्या नावानं ओळखलं जातं होतं.

एकादशीच्या पुजेसाठी जमली गर्दी

आज एकादशी निमित्त मंदिरात भाविकांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या. पण मंदिरात प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. यामुळे चेंगराचेंगरीसारखी घटना घडली. या रस्त्यावर शेकडो भाविक अडकले आणि ते दुर्घटनेचा शिकार झाले. सूत्रांनी म्हटलंय की, मंदिर व्यवस्थापनाने स्थानिक प्रशासनाला याबाबतची माहितीही दिली नव्हती. यामुळे मंदिरात गर्दीचं नियंत्रण करण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. शेकडो भाविक एकादशी पूजेला मंदिरात दर्शनासाठी पोहोचले.

सरकारने या मंदिराकडे लक्षं दिलं नाही, कारण..

मंत्री रामनारायण रेड्डी यांनी म्हटलंय की, सरकारकडून या मंदिराची देखभाल केली जात नाही. या मंदिरात 2000 ते 3000 भाविक दर्शनाला येऊ शकतात. पण आज एकादशी असल्याने 25 हजार भाविक इथे आले होते. अतिरिक्त भाविकांसाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती. तसच सरकारलाही कोणतीच माहिती दिली गेली नाही. त्यामुळे हा अपघात घडला आहे.

नक्की वाचा >> "दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली, सर्व मराठीच, पण..", उद्धव ठाकरेंनी भाजपची केली पोलखोल!

राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींनी या घटनेवर

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम येथील व्येंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं. प्रधानमंत्री कार्यालय (पीएमओ) ने मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकाकुलम स्थित काशीबुग्गा येथील व्येंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत कमीत कमी दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे.

नक्की वाचा >> जॅकी श्रॉफच्या पुण्यातील फार्म हाऊसमध्ये टायटॅनिक स्पॉट, थिएटर, 700 झाडे अन्..नजारा पाहून फराह खानही झाली थक्क

पीएम नरेंद्र मोदी यांनी एक्सवर म्हटलं की, आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळं मला दु:खं झालं. आपल्या कुटुंबीयांना गमावलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करत आहे. जखमींवर लवकरच उपचार होतील, अशी प्रार्थना करतो. दर पीएमओ कार्यालयाकडून जखमींना 50-50 हजारांची मदतही घोषित करण्यात आली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com